Mini Switzerland India: अरे हे तर भारतातलं स्वित्झर्लंड …! यंदाच्या सुट्टीत भेट द्या ‘या’ 4 ठिकाणांना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mini Switzerland India: उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. काही दिवसात मुलांच्या सुद्धा परीक्षा संपून सुट्ट्या सुरु होतील. यंदाच्या सुट्टीत तुम्ही कुठे निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन (Mini Switzerland India) करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही चांगले पर्याय सुचवणार आहोत. आपल्याला परदेशातल्या निसर्ग सौन्दर्याबद्दल फारच कुतूहल वाटत असते. स्वित्झर्लंड ,कॅनडा अशा लोकप्रिय ठिकणांची तर यादीच तयार असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का भारतात अशी चार ठिकाणे आहेत ज्याला पाहिल्यावर तुम्ही आपसूकच म्हणाल अरे हे तर भारतातलं स्वित्झर्लंड …! चला तर मग मग जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल…

खज्जियार

हिमाचल प्रदेशात वसलेले हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे एक छोटेसे गाव आहे, मिनी स्वित्झर्लंडच्या (Mini Switzerland India) यादीत खज्जियारला अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे. खज्जियारच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे खज्जियार तलाव, येथील दृश्य पाहिल्यावर तुम्हाला एखाद्या चित्रपटातला सिन तर पाहत नाही आहोत ना ? असे वाटेल. याशिवाय येथे अनेक दऱ्या आणि टेकड्या आहेत, ज्या ट्रेकिंग प्रेमींना खूप आवडतात. ऑफिसला जायचा कंटाळा आला असेल आणि जरा विश्रांती घ्यायची असेल तर इथे एकदा नक्की या. हे तलाव देखील खूप अनोखे आहे, येथे एक सुंदर तलाव आहे ज्याचे पाणी हिरव्या आणि निळ्या रंगाचे दिसते.

औली

उत्तराखंडचे औली हे भारताचे मिनी स्वित्झर्लंड आहे, ते उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात येते. हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेषत: स्कीइंग आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध झाले आहे. इथून आजूबाजूचे दृश्य खूप सुंदर आहे, जर तुम्ही स्वित्झर्लंडला (Mini Switzerland India) जाण्याचा विचार करत असाल तर इथे फिरायला जाऊ शकता. औलीमध्ये अनेक नैसर्गिक ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना आकर्षित करतात. फिरण्यासाठी येथे नंदा देवी मंदिर आहे जिथे देवी नंदा देवीची पूजा केली जाते. चांगली गोष्ट म्हणजे कैलास मानसरोवर यात्राही येथूनच सुरू होते.

जम्मू काश्मीर

जम्मू-काश्मीर हे भारताचे मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland India) म्हणून ओळखले जाते, हिवाळ्यात हे ठिकाण बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र चादरीने झाकलेले असते. येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे, परदेशातूनही लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. काश्मीरचे प्रमुख आकर्षण असलेले दल सरोवर हे हिवाळ्यात गोठलेले असते . ते इतके गोठते की लोक त्यावर चालतही जाऊ शकतात. श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम सारखी ठिकाणे पर्यटकांना येथे भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत.

मणिपूर

जर तुम्ही स्वित्झर्लंडला जाण्याचा विचार करत असाल, तर तिथे इतके पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही मणिपूरचा पर्यायही निवडू शकता. या ठिकाणाला मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland India) असेही म्हणतात. येथील सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे. कांगलेपाटी, लोकटक तलाव ही ठिकाणे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. एवढेच नाही तर किबुल लांजो नॅशनल पार्कमध्ये जाऊन जंगल सफारीचा आनंद लुटू शकता.