Missing Link : महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग; मुंबई-पुण्याला जोडणार 180 मीटर उंच केबल-स्टेड पूल

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Missing Link : मुंबई आणि पुणे ही राज्यातली दोन महत्त्वाची शहर आता एका हवेत तरंगणाऱ्या महामार्गाद्वारे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. अर्थात हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक लक्षवेधी आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प मिसिंग लिंक प्रकल्प.

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान (Missing Link)

या प्रकल्प अंतर्गत मुंबई पुण्याला जोडण्यासाठी 180 m उंच केबल स्टेट पूल उभारले जात आहेत त्यामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. सध्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे काम पूर्ण करायचे आहे कारण हा टप्पा अतिशय आव्हानात्मक आहे. पावसाळ्यात हे काम करणं जवळपास अशक्य आहे अशी माहिती इथल्या (Missing Link) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे पुणे आणि मुंबई हे अंतर 6 km ने कमी होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवाशांची लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका देखील होणार आहे. डिसेंबर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं एमएसआरडीसीचा टारगेट होतो मात्र निश्चित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्त्वकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

90 टक्के काम पूर्ण (Missing Link)

सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेड पुल उभारणे हे इंजीनीयर्ससाठी मोठे आव्हान असणार आहे. 2024 मध्ये खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा पावसाळा सुरु होण्याआधी हा आव्हानात्मक टप्पा पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत याचे काम पूर्ण होण्याची (Missing Link)शक्यता वर्तवली जात आहे.