Mobile Accessories Business : फक्त 5 हजारात सुरु करा ‘हा’ ट्रेंडिंग व्यवसाय; झटपट व्हाल मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mobile Accessories Business) आजकाल प्रत्येकाला नोकरीसोबत अधिक कमाईची अपेक्षा असते. ज्यासाठी बरेच लोक विविध व्यवसाय करतात. कुणी जादा काम किंवा ओव्हरटाईम करतात तर कुणी साईड बिझनेसमधून चांगली कमाई करतात. वाढत्या आधुनिकतेमुळे बाजारात अनेक वस्तूंची मागणी वाढत चालली आहे. ती लक्षात घेतली तर साहजिकपणे तुम्हीही चांगले व्यावसायिक होऊ शकता. अगदी नोकरी सांभाळून तुम्ही बिझनेस करून अधिक कमाई कराल अशा एका भन्नाट व्यवसायाची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

मुख्य म्हणजे, यामध्ये फार पैसा गुंतवण्याचीसुद्धा गरज पडणार नाही. शिवाय या व्यवसायाला कोणत्याही हंगामाची गरज नाही. वर्षाचे बारा महिने हा व्यवसाय एकदम जोरदार चालतो. आपण मोबाईल ॲक्सेसरीजच्या व्यवसायाविषयी बोलत आहोत. (Mobile Accessories Business) आजच्या युगात मोबाईल वापरत नाही असा क्वचितच कुणी असेल. मोबाईल युजर्सला चार्जर, इअरफोन, ब्लूटूथ, विविध केबल्स, मोबाईल स्टँड, कार्ड रीडर, साउंडबार स्पीकर अशा अनेक गोष्टींची सतत गरज असते. त्यामुळे बाजारात या वस्तुंना विशेष मागणी आहे. चला तर हा बिझनेस कसा सुरु करायचा? ते जाणून घेऊया

कसा सुरू कराल? (Mobile Accessories Business)

आत्ताच्या ट्रेंडनुसार मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. दरम्यान, सध्या कोणत्या ॲक्सेसरीजला जास्त डिमांड आहे हे आधी लक्षात घ्या आणि त्यानुसार स्वतः वस्तू खरेदी करा. विविध श्रेणीतील वस्तू पाहून ग्राहकांना उत्पादन खरेदी करताना चांगले ऑप्शन मिळतील. ज्यामुळे त्यांना हव्या असलेल्या बऱ्याच वस्तू ते एकाच छताखाली विकत घेऊ शकतील. यामुळे त्यांनी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याची शक्यता वाढेल. मात्र, यासाठी खूप वस्तूंची खरेदी करून ठेऊ नका. सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी छोटे स्टॉल लावून किंवा सार्वजनिक परिसरात वॉकिंग स्वरूपात तुम्ही हा व्यवसाय फुल डे किंवा पार्ट टाइम करू शकता.

कमी गुंतवणुकीत चांगली कमाई

सध्याच्या घडीला मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय आपल्या खर्चाच्या किमान दोन ते तीन पट नफा मिळवून देऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर, समजा तुम्ही एखादी वस्तू १० रुपयांना विकत घेतली असेल तर तुम्ही तीच वस्तू बाजारात ५० रुपये किमतीने विकू शकता. (Mobile Accessories Business) या व्यवसायाचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाले तर, हा व्यवसाय सुरु करतेवेळी केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक पुरेशी ठरेल. पुढे जसा व्यवसाय वाढेल, तुमची कमाई वाढेल तशी तुम्ही गुंतवणूक वाढवून अधिक नफा काढू शकता.