हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mobile Recharge – TRAI च्या नवीन नियमांमुळे आता मोबाइल यूजर्सना सिम कार्ड एक्टिव ठेवण्यासाठी फक्त 20 रुपयांची आवश्यकता आहे. यामध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. याआधी, यूजर्सना सिम एक्टिव ठेवण्यासाठी कमीत कमी 199 रुपये दर महिन्याला रिचार्ज करावा लागत होता , पण TRAI च्या नवीन नियमामुळे हा खर्च कमी होईल. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ऑटोमेटिक नंबर रिटेंशन स्कीम लागू –
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ऑटोमेटिक नंबर रिटेंशन स्कीम लागू केली आहे. या स्कीमनुसार, टेलिकॉम ऑपरेटर (जिओ, एअरटेल, BSNL, VI) सर्वांना 20 रुपयांचा मिनिमम प्रीपेड बैलेंस ठेवून सिम एक्टिव ठेवण्याची सुविधा देणार आहेत. यामुळे, 90 दिवसांपर्यंत कोणतीही सेवा वापरण्याची आवश्यकता नाही, तरीही सिम कार्ड एक्टिव राहील.
सिम कार्ड 30 दिवसांसाठी एक्टिव (Mobile Recharge)–
जर 90 दिवसांपर्यंत यूजर्सने कॉल्स, डेटा किंवा SMS वापरण्याची सेवा घेतली नाही, तर त्यांच्या खात्यात किमान 20 रुपये असले पाहिजेत. हे 20 रुपये आपल्या खात्यात राहिल्यास, सिम कार्ड 30 दिवसांसाठी एक्टिव राहील आणि हा प्रोसेस सुरू राहील जोपर्यंत खात्यात पैसे (Mobile Recharge)असतात. जर खात्यात पैसे नसल्यानंतर 15 दिवसांचा ग्रेस पीरियड मिळेल. या काळात रिचार्ज न केल्यास, सिम कार्ड डिएक्टिव्हेट होईल.
कोणतीही सेवा मिळणार नाही –
या नियमाचा उद्देश यूजर्सला कमी खर्चात सिम एक्टिव ठेवण्याची सुविधा देणे आहे. मात्र, 20 रुपये ठेवण्यामुळे सिम एक्टिव राहील, परंतु त्यावर कोणतीही सेवा मिळणार नाही. म्हणजे, इनकमिंग आणि आऊटगोइंग कॉल्स, SMS आणि इतर सर्व सेवा बंद राहू शकतात.
हे पण वाचा : अटल पेन्शन धारकांना मिळणार मोठा लाभ? पेन्शन रक्कम होणार दुप्पट?