Money Earning : फक्त E-Mail वाचून करा हजारोंची कमाई; कशी? ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Money Earning) आजकाल प्रत्येकासाठी पैसा महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे जो तो पैसे कमावण्याच्या शर्यतीत रोज धावताना दिसतोय. अनेक लोकांना महिनाभर काम करूनही त्यांचा पगार घर खर्च भागवण्यासाठी पुरेसा ठरत नाही. अशावेळी हे लोक अधिक उत्पन्नाचा विचार करू लागतात. यासाठी विविध आयडियादेखील अमलात आणतात. त्यातील काही आयडीया हिट तर काही फ्लॉप ठरतात. आज आम्ही देखील तुम्हाला नोकरी शिवाय उत्पन्न साठी मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सुचवणार आहोत. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही जागेची किंवा मोठ्या गुंतवणुकीची अजिबात गरज नाही.

आजच्या डिजिटल युगात जवळपास सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतात. ज्यावर दिवसभरातील सर्वाधिक वेळ आपण घालवतो. पण तरीसुद्धा आपल्या फोनवर दिवसभरात आपल्याला किती मेसेज किंवा मेल आलेत याचा किती लोकांना अंदाज आहे? अनेक लोक तर असे आहेत जे मेसेज न पाहता थेट डिलीट करून टाकतात. पण ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही अगदी आवडीने मेल्स वाचायला सुरुवात कराल. कारण, या माध्यमातून तुम्हाला अतिरिक्त कमाई करता येणार आहे. यासाठी तुमचा स्मार्टफोन तुम्हाला मदत करेल. (Money Earning) चला तर मेल वाचून पैसे कसे कमवायचे? हे जाणून घेऊया.

मॅट्रिक्समेल डॉट कॉम

मॅट्रिक्समेल डॉट कॉम ही एक अशी वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता. ही वेबसाईट २००२ पासून काम करतेय. (Money Earning) या वेबसाईटवरील केवळ मेल वाचल्याने तुम्हाला चांगली कमाई करता येईल. इतकेच नव्हे तर या साइटवरील ऑफर्स आणि केवळ वेबसाईटला भेट दिल्याने सुद्धा तुम्ही पैसे कमावू शकता. दिवसभरातून केवळ तासभर जरी या वेबसाईटवर काम केलं तरी तुम्ही अगदी सहज २५ ते ५० डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार २ ते ४ हजार रुपये कमवू शकता.

पैसा लाईव्ह डॉट कॉम (Money Earning)

पैसा लाईव्ह डॉट कॉम या वेबसाईटवरसुद्धा कोणत्याही गुंतवणुकीशिवाय तुम्ही हजारो रुपयांची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त वेबसाईटवर स्वतःचे खाते तयार करायचे आहे. असे करताक्षणी तुम्हाला लगेच ९९ रुपये मिळतील. याच वेळी जर तुम्ही तुमच्या २० मित्रांची खाती तयार केलात तर आणखी २० रुपये तुम्हाला मिळतील.

(Money Earning) या वेबसाईटवर प्रत्येक मेल वाचण्यासाठी २५ पैसे ते ५ रुपये दिले जातात. ही वेबसाईट महिनाअखेरची वाट बघत नाही. तर प्रत्येक १५ दिवसांनी चेकद्वारे पेमेंट करते. म्हणजेच प्रत्येक १५ दिवसांनी तुम्हाला तुमची अतिरिक्त कमाई मिळवता येईल.

सेंडर अर्निंग डॉट कॉम

सेंडर अर्निंग डॉट कॉम ही वेबसाईटदेखील तुम्हाला अतिरिक्त कमाई करून देण्यासाठी चांगला पर्याय आहे. यासाठी वेबसाईटवर आपले खाते उघडा आणि यानंतर त्यावरील ईमेल वाचा. यावर १ ईमेल वाचण्यासाठी तुम्हाला १ डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ७० रुपये आरामात मिळतील. मुख्य म्हणजे, या वेबसाईटला नियमितपणे भेट देणे गरजेचे आहे. जर तुम्ही वेबसाईटवर ६ महिने किंवा त्याहून जास्त काळ सक्रिय नसाल तर तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल.

या वेबसाईटच्या माध्यमातून पेमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला नियमित वेबसाईटवरील ईमेल वाचणे गरजेचे आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून चांगली कमाई होण्याकरिता तुम्हाला किमान आधी २१०० रुपये कमवावे लागतील. त्यानंतर येणारी कमाई ही तुमची अतिरिक्त कमाई मानली जाईल. (Money Earning)