Monsoon Tips : पावसाळा हा ऋतू कोणाला आवडत नाही ? पावसाळा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. निसर्गाचं खुललेलं रूप , पावसाळा आणि गरमागरम भजी, चहा अहाहा …! क्या बात ! पण पावसाळ्यात अनेक नकोशा गोष्टी सुद्धा होत असतात. पावसाळ्यात बुरशी हा प्रकार खूप तापदायक ठरतो. पावसाळ्यात भिंती वर, लाकडांवर हमखास बुरशी होते. एवढेच काय तर चपलांवर सुद्धा बुरशी चढते. त्यामुळे तुमची महागडी चप्पल, शूज खराब होतात. त्यातही कातडी चपला आणि शूज वर पावसाळ्यात हमखास बुरशी चढते. चला आजच्या लेखात यावरच कोणता उपाय (Monsoon Tips) करता येईल पाहूया…
मेणाचा वापर (Monsoon Tips)
पावसाळ्यात बूट चप्पल खराब होऊ नये त्यासाठी तुम्ही मेणाचा वापर करू शकता. बुटाच्या वरच्या भागावर मेन चोळा आणि त्यानंतर हेअर ड्रायर मधून हवा गरम द्या. अशाप्रकारे बुटामध्ये मेन शोषले जाईल आणि तुमच्या बुटावर एक प्रकारचा वॉटरप्रूफ लेयर तयार होईल त्यामुळे बुरशी लागणार नाही
वॉटरप्रूफ स्प्रेचा वापर करा
पावसाळ्यासाठी वॉटरप्रूफिंग स्प्रे बाजारात आणि शू स्टोअर्स मध्ये सहज (Monsoon Tips) उपलब्ध असतात. जर तुम्ही शूजच्या पृष्ठभागावर हा स्प्रे फवारला तर पाण्याच्या संपर्कात आल्यानंतरही हे तुमचे शूज खराब होणार नाहीत.
वॉटरप्रूफ शू कव्हर (Monsoon Tips)
पावसाळ्यात अनेक जण वॉटरप्रूफ शू कव्हर वापरतात. हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. जेव्हा तुम्हाला पावसात जायचं असेल तेव्हा तुम्ही हे शू कव्हर तुमच्या शूजला घाला आणि बाहेर जा त्यामुळे तुमचे शूज चांगले राहतील
काय घ्याल काळजी?
- पावसाळ्यामध्ये कातडी शूज ना बुरशी लागते त्यामुळे ते हवीशीर जागेमध्ये ठेवा.
- तुम्ही शूज कागदामध्ये चांगल्या पद्धतीने रॅप करून ठेवू (Monsoon Tips) शकता
- ओले शूज कपाटात अजिबात ठेवू नका.
- कातडी चपलांना बुरशी येत असेल तर अगदी पूर्वीच्या काळापासून वापरला जाणारा नुसखा म्हणजे कातडी चपलांना तेल लावून ठेवले जाते त्यामुळे त्यांना बुरशी येत नाही.
- तुमच्या चपलाच्या रॅकमध्ये डांबर (Monsoon Tips) गोळ्या ठेवा.