Mother’s Day : खरंतर आईसाठी कुठला एक खास दिवस नसतो. आई ही अशी असते की जिच्यासाठी सम्पूर्ण वर्षभर सेलिब्रेशन केलं तरी कमीच पडेल. जभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी १२ मे रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. हा दिवस कसा साजरा करायचा याचे अजून नियोजन केले नसेल तर हरकत नाही. आम्ही तुम्हाला मदत करू. आम्ही तुम्हाला पुण्यातील काही खास ठिकाणांबद्दल (Mother’s Day) सांगत आहोत जे मदर्स डेच्या दिवशी तुमच्या आईला घेऊन जाण्यासाठी परफेक्ट ठिकाणं ठरतील यात शंका नाही.
पाषाण तलाव (Mother’s Day)
पुण्याजवळील पाषाण तलाव हा एक कृत्रिम तलाव आहे. येथील ताजी हवा असते हवेत शांततेने श्वास घ्या आणि नैसर्गिक सौंदर्याचा मनापासून आनंद घ्या.तसेच तुमच्या आईच्या बालपणीच्या गोष्टी आणि खोड्या ऐकवायला विसरू नका. आपल्या आईचे मन देखील जाणून घ्या. जेणेकरून रात्रीच्या जेवणात तिला काय खायचे आहे ? हे समजेल. इथे हवं तर आईसोबत बोटीतही फिरू शकता, तिला आवडेल.
मुळशी तलाव आणि धरण
हे पुण्यातील सर्वात जुन्या आकर्षणांपैकी एक आहे. या धरणाचा वापर जलविद्युत निर्मितीसाठी होतो. गोंगाटापासून दूर शांत वातावरणात काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. टेकड्या आणि हिरवीगार जंगले यांच्या मधोमध या ठिकाणाचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते. इथे तुम्ही तुमच्या आईशी खूप बोलू शकता (Mother’s Day) आणि हो, तुमच्या आईवर तुमचे किती प्रेम आहे हे सांगायला विसरू नका.
आगा खान पॅलेस (Mother’s Day)
पुण्यातील येरवडा येथे ही ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत सुलतान मोहम्मद शाह आगा खान दुसरा यांनी बांधली होती. महात्मा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना येथे कैद करून ठेवले होते. कस्तुरबा गांधी यांचाही याच राजवाड्यात मृत्यू झाला. त्यांची समाधीही येथेच आहे. या इमारतीत एक संग्रहालयही आहे. ही इमारत बाहेरून अतिशय सुंदर दिसते. तुमच्या आईला अशा ऐतिहासिक स्थळांना भेट (Mother’s Day) देण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात रस असेल तर तिला नक्कीच इथे घेऊन या.