हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mothers Day) मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे अर्थात मातृदिन साजरा केला जातो. या वर्षातील मातृदिन येत्या १२ मे २०२४ रोजी आहे. या दिवशी मुलं आपल्या आईसाठी काहीतरी खास काहीतरी स्पेशल करताना दिसतात. कुणी आईला हवी असलेली एखादी वस्तू भेट म्हणून देत, तर कुणी आईला फिरायला, जेवायला किंवा मुव्ही डेटवर घेऊन जातात. अशा विविध प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. आईप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी दगदगीच्या जीवनातील हा एक खास दिवस आहे. त्यामुळे हा दिवस मिस करून कसं चालेल?
खरंतर आईवरील प्रेम व्यक्त करायला निश्चित दिवस असण्याची गरज नाही. पण मुलं मोठी होत असताना वाढता अभ्यास, शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय याचा गुंता वाढत जातो आणि मुलांना आईला वेळ देणे कठीण होणे. अशावेळी हा दिवस खऱ्या अर्थाने खास ठरतो. काय मग? तुम्ही यंदाचा मदर्स डे कसा साजरा करणार आहात? काही ठरलय का? नाही? (Mothers Day) तर मग आज आम्ही तुम्हाला आईसोबत विकेंड ट्रिप करता येईल असे काही चांगले पर्याय देणार आहोत. म्हणजे रोजच्या दगदगीतून आणि त्याच त्याच व्यापातून तुम्हाला आणि तुमच्या आईलाही थोडी क्षणभर विश्रांती मिळेल. मुख्य म्हणजे तुम्हाला आईसोबत निवांत वेळ घालवता येईल. चला तर आईसोबत फिरायला जाता येईल अशा परफेक्ट डेस्टिनेशन्सची माहिती घेऊया.
हिमाचल प्रदेश – कुफरी
हिमाचल प्रदेशातील शिमला- मनाली हे हिल स्टेशन अत्यंत प्रसिद्ध आहे. इथे कायम पर्यटकांची गर्दी असते. शांत आणि थंड ठिकाण म्हणून या ठिकाणी जाणे फारच आनंददायी आहे. (Mothers Day) त्यामुळे आईला एक मस्त सरप्राईज द्यायचं असेल तर तिला घेऊन कुफरीला जा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणचे हवामान अतिशय आल्हाददायक आणि थंड असते. हा अनुभव घेण्यासाठी आईला घेऊन नक्की जा.
उत्तराखंड – ऋषिकेश (Mothers Day)
उत्तराखंड म्हणजे देवभूमी. मातृदिन म्हणजे देवाचाच दिवस. त्यामुळे अध्यात्माशी जोडून घ्यायचे असेल तर ऋषिकेशला भेट द्या. अध्यात्मासह तुमची आई योगा अभ्यासाचा देखील आनंद घेऊ शकेल. येथील मंदिरांना भेट देऊन तुमची आई नक्कीच आनंदी होईल. शिवाय संध्याकाळी गंगेच्या काठावर आरती आणि शांततापूर्ण वेळ घालवताना आईसोबतचा निवांत वेळ कधी सरेल तुम्हाला कळणार नाही.
तामिळनाडू – उटी
मदर्स डे सेलिब्रेशनसाठी तामिळनाडूमधील निलगिरी टेकड्यांमध्ये वसलेले उटी हे नयनरम्य हिल स्टेशन जरूर एक्सप्लोर करा. (Mothers Day) चहाचे विस्तीर्ण मळे, निर्मळ तलाव, फेसाळणारे धबधबे यासोबत उटी लेक, बोटॅनिकल गार्डन, पायकारा वॉटरफॉल आणि केट्टी या टॉय ट्रेनचा आनंद तुम्ही तुमच्या आईसोबत घेऊ शकता.
कर्नाटक – कुर्ग
जर तुम्ही तुमच्या आईसोबत लॉन्ग ट्रिपचा विचार करत असाल तर कर्नाटकातील कुर्ग हिल स्टेशनला भेट द्या. उष्ण वातावरणापासून सुटका आणि आल्हाददायी अनुभवासाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकते. कुर्ग अत्यंत सुंदर पर्यटन स्थळ असून इथल्या हिरव्यागार दऱ्या नयनरम्य आहेत. (Mothers Day) शिवाय चहा- कॉफीच्या बागा, घनदाट जंगले आणि धबधबे यांचे सौंदर्य पाहून तुमची आई नक्कीच आनंदी होईल.