हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola Edge 60 Pro – मोटोरोला कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दमदार फीचर्ससह अन आकर्षक किमतीत बाजारात सादर करण्यात आला आहे. Motorola Edge 60 Pro मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी, 90W फास्ट चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आणि IP69 रेटिंगसह पाणी व धूळरोधक डिझाइन मिळते. तसेच स्मार्टफोनमध्ये ( Motorola Edge 60 Pro) 6.7 इंचांचा 1.5K POLED डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि तो Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शनसह येतो. याची स्क्रीन 4500 निट्स पीक ब्राइटनेसपर्यंत जाऊ शकते, त्यामुळे सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्टपणे दिसते.
Motorola Edge 60 Pro चे फीचर्स –
फोनमध्ये MediaTek Dimensity 8350 Extreme 4nm प्रोसेसर आणि Mali-G615 MC6 GPU आहे, ज्यामुळे गेमिंग आणि मल्टिटास्किंगचा अनुभव उत्तम राहतो. यामध्ये 8GB किंवा 12GB RAM आणि 256GB स्टोरेजचा पर्याय आहे. Motorola Edge 60 Pro Android 15 वर आधारित आहे आणि कंपनीने 3 वर्षांच्या OS अपडेट्स आणि 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेट्सची हमी दिली आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत, यात OISसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड + मॅक्रो कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा 3x टेलीफोटो कॅमेरा (50x Super Zoom) दिला आहे. सेल्फीसाठी सुद्धा 50MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.
कनेक्टिव्हिटी –
कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.4, NFC, GPS आणि USB Type-C सारखे फीचर्स मिळतात. हे डिव्हाइस पॉवरफुल परफॉर्मन्स, उत्कृष्ट कॅमेरा आणि मजबूत डिझाइनसाठी योग्य पर्याय ठरतो.
Motorola Edge 60 Pro ची किंमत –
Motorola Edge 60 Pro ची भारतात 8GB + 256GB वेरियंटची किंमत 29,999 रु आहे आणि 12GB + 256GB वेरियंट 33,999 रु मध्ये मिळतो. हा फोन Blue, Shadow आणि Sparkling Grape या रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची प्री-ऑर्डर 30 एप्रिलपासून Flipkart आणि Motorola India वर सुरू झाली असून, विक्री 7 मे 2025 पासून सुरू होईल.




