Motorola Edge 60: 5500mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह Motorola Edge 60 स्मार्टफोन लाँच; पहा फीचर्स अन किंमत

Motorola Edge 60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola Edge 60 – Motorola ने भारतात आज (2 एप्रिल 2025) आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 लाँच केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 प्रोसेसर, 5500mAh ची बॅटरी आणि 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सारखे आकर्षक फीचर्स दिले गेले आहेत. तसेच मोटो एज 60 फ्युजन स्मार्टफोन डस्ट आणि वॉटर-रेसिस्टंट बिल्डसह, MIL-810H मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मोटोरोला एज 50 फ्युजन चा अपग्रेडेड वेरियंट आहे, जो मे 2024 मध्ये लाँच झाला होता.

Motorola Edge 60 चे फीचर्स –

मोटोरोला एज 60 फ्युजन स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाची 1.5K (1,220×2,712 पिक्सल) ऑल-कर्व्ड POLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेमध्ये 120Hz चं रिफ्रेश रेट आहे. तसेच, स्क्रीन 300Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट ऑफर करते. डिस्प्ले 4500 निट्स पीक ब्राइटनेस आणि HDRIO+ सपोर्ट करते. डिस्प्लेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 ची सुरक्षा दिली आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 प्रोसेसर आहे. डिवाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिलं आहे. तसेच या स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. हँडसेट Android 15 बेस्ड Hello UI वर चालतो आणि तीन वर्षांपर्यंत Android OS अपडेट्स तसेच 4 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट्स मिळतील.

कॅमेरा –

कॅमेराच्या बाबतीत, मोटोरोला एज 60 फ्युजनमध्ये 50 मेगापिक्सल Sony LYT700C प्राइमरी रियर सेंसर आहे, जो f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सपोर्ट करतो. यासोबतच, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर f/2.2 अपर्चर सह दिला आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी आदर्श आहे. या फोनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचा सपोर्ट आहे.

इतर फीचर्स –

Motorola Edge 60 फ्युजनमध्ये Moto AI फीचर्स, इमेजिंग आणि प्रोडक्टिविटी टूल्स जसे की photo enhancement, adaptive stabilisation, magic eraser आणि Google Circle to Search सारखे फीचर्स आहेत. यामध्ये Moto Secure 3.0, Smart Connect 2.0, Family Space 3.0 आणि Moto Gestures देखील उपलब्ध आहेत. हेडसेटमध्ये Dolby Atmos सिस्टिम असलेल्या ड्यूल स्टीरिओ स्पीकर्स देखील आहेत.

किमत –

Motorola Edge 60 फ्युजन च्या 8GB रॅम व 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 12GB रॅम व 256GB स्टोरेज वेरियंट 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. 9 एप्रिल 2025, दुपारी 12 वाजल्यापासून याची विक्री सुरू होईल. फोन Pantone Imagine, Pantone Slipstream, and Pantone Zephyr color (पेंटोन ऐमजनाइट, पेंटोन स्लिपस्टीम आणि पेंटोन जेफायर) रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल.