Motorola Edge 60 Stylus: Motorola Edge 60 Stylus भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा

Motorola Edge 60 Stylus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola Edge 60 Stylus – Motorola कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Stylus लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अनेक प्रगत फिचर्ससह सुसज्ज असून यामध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी, 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. सर्वात खास बाब म्हणजे हा फोन बिल्ट-इन स्टायलससह येतो, जो आपल्या सेगमेंटमध्ये पहिलाच असा फोन ठरतो. याला IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंग मिळालेली असून MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी सर्टिफिकेशनही मिळाले आहे. तर या फोनचे फीचर्स अन किमतीबद्दल जाणून घेऊयात.

Motorola Edge 60 Stylus चे फीचर्स –

फोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K POLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असून टच सॅम्पलिंग रेट 300Hz आहे. यामध्ये 3000 निट्स पीक ब्राइटनेससह Aqua Touch आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन मिळते. Motorola Edge 60 Stylus मध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसोबत येतो. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 15 बेस्ड Hello UI वर काम करतो आणि कंपनीने दोन मुख्य OS अपडेट्स व तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे.

कॅमेरा –

Motorola Edge 60 Stylus यामध्ये 50 मेगापिक्सल Sony LYTIA 700C प्राइमरी, 13 मेगापिक्सल अल्ट्रावाइड, आणि एक 3-in-1 लाइट सेंसर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये Moto AI फिचर्स, Adobe Doc Scan, आणि Dolby Atmos सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत. सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Motorola Edge 60 Stylus ची किंमत अन ऑफर्स –

Motorola Edge 60 Stylus ची किंमत 22,999 रुपये असून तो 23 एप्रिलपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडियाची वेबसाइट आणि काही निवडक रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. फ्लिपकार्टवरून खरेदी करताना 1000 रु पर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळतो, ज्यामुळे किंमत 21,999 रु राहते. याशिवाय, एक्सिस बँक व IDFC बँकेच्या कार्डधारकांना 1000 रु ची अतिरिक्त सूट मिळते. रिलायन्स जिओ ग्राहकांना 2000 रु पर्यंत कॅशबॅक आणि शॉपिंग, फ्लाइट व हॉटेल बुकिंग्सवर 8000 रु पर्यंतचे फायदे मिळणार आहेत.