Mukesh Ambani : मुकेश अंबानी देणार मोठे गिफ्ट ! लवकरच पेट्रोल डिझेल स्वस्त मिळण्याची चिन्हे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mukesh Ambani : आपल्याला माहितीच आहे की देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उचांक गाठला आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्वस्त होण्यामागं उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा हात असणार आहे. आता तुम्ही म्हणाल पेट्रोल डिझेलच्या किमती आणि अंबानी यांचा काय बरं कनेक्शन आहे? तर ते नक्की काय आहे जाणून घेऊयात…

डिसेंबर महिन्यामध्ये पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी पेट्रोलियम मंत्रालयांने एक निर्णय घेतला त्यानुसार ज्या देशांवर निर्बंध नाहीत अशा कोणत्याही देशाकडून भारत कच्चे तेल आयात करू शकतो. त्यामुळे व्हेनेझुएला या देशाकडून तीन वर्षांनंतर कच्चे तेल खरेदी करण्याच्या आशा आता पल्लवीत (Mukesh Ambani) झाल्या आहेत 2019 मध्ये या देशावर निर्बंध घालण्यात आले होते ते हटल्यानंतर आता कच्चे तेल खरेदीचा निर्णय होऊ शकतो कम्युनिटी मार्केट ऍनालिटिक्स फॉर्म केपलर नुसार खरेदीनंतर सर्वात शेवटी व्हेनेझुएलाकडून भारताला नोव्हेंबर 2020 मध्ये कच्च्या तेलाची खेप पाठवण्यात आली होती.

डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला व्हेनेझुएला कडून कच्चं तेल खरेदी करण्याचा सौदा होऊ शकतो हे स्पष्ट झालं होतं. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज त्यासाठी थेट सौदा करणार असल्याचे समोर आलं होतं कंपनीने या देशाकडून सध्या तीन टँकर कच्चे तेल खरेदीची बुकिंग केली आहे. जानेवारी 2024 पासून हे कच्चे तेल भारतात यायला सुरुवात होईल रिलायन्स (Mukesh Ambani) इंडस्ट्रीज पूर्वी नयारा एनर्जी पूर्वीपासूनच व्हेनेझुएला कडून कच्च्या तेलाची खरेदी नियमितपणे करत होते आता ही खेप आल्यानंतर देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या भारत रशियाकडून (Mukesh Ambani) सवलतीत कच्च्या तेलाची आयात करत आहे पण आता ही सवलत केवळ दोन डॉलर प्रतिबॅलर पर्यंत खाली आहे. तर व्हेनेझुएला कडून देशाला आठ ते दहा डॉलर प्रति बॅरल पर्यंत स्वस्तात कच्च तेल मिळू शकते,. व्हेनेझुएलाकडून हा कच्चा तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना OPEC चा सदस्य आहे.