लाडकी बहीण योजनेमुळे महिला बनल्या स्वावलंबी ; व्यवसायात घेतली भरारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाविकास आघाडी सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योज़नेला विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला मात्र या योजनेतुन महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. आणि त्याचा उपयोग महिलांनि स्वात:ला सक्षम बनवण्यासाठी केलाय. महाराष्ट्रात महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वातंत्र्यासाठी कुटुंबात समाजात स्वतःचे कणखर स्थान निर्माण व्हावे या उद्देशाने राज्यात लाडकी बहिण योजना सुरु केली.महायुटी सरकारने 28 जून 2924 रोजी या योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार असा आर्थिक लाभ दिला जात आहे. ही योजना गाव खेड्यापर्यंत पोहचली असून या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना आतापर्यंत साडे सात हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे.

लोकप्रिय झाली महायुती सरकारची योजना

या योजनेसाठी तब्बल अडीच कोटी महिलांनी अर्ज दाखल केले. ही योजना तळागळांपर्यंतच्या महिलांपर्यंत पोहचली आहे. महिलांना या योजनांचा जसा जसा महिलांना लाभ मिळू लागला तशी-तशी ही योजना आणखीनच लोकप्रिय होऊ लागली. त्यामुळे बिथरलेल्या विरोधकांकडून जाणीवपूर्वक या योजनेची बदनामी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

विरोधक पसरवत आहेत अफवा

विरोधकांकडून योजनेसंदर्भात अनेक अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. विरोधकांकडून सरकारच्या तिजोरीत खडखडात आहे पैसे कुठून देणार असा सवाल केला आहे. पण सरकारने या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करुन विरोधकांच्या प्रश्नाला चोख उत्तर दिले आणि बोलती बंद करुन टाकली. राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेचे भाऊबीजेपर्यंत साडेसात हजार रुपये जमा केले.

महिलांना व्यवसायासाठी मोठी मदत

महिलांना या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर मदत झाली. महिला घराबाहेर पडत आहेत, शिक्षण स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यावर भर देताना दिसत आहेत. या योजनेचे पैसे चांगल्या कारणासाठी वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यात एक सांगायचे झाल्यास या योजनेच्या माध्यमातून कित्येक गृहीणींना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला.

आता दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही

एका महिलेने या योजनेतून मिळणाऱ्या पैशांची गुंतवणूक स्वतःच्या कपड्याच्या व्यवसायात केली. साडे सात हजारांची गुंतवणूक करुन या महिलेने 15 हजारांचा नफा कमावला. किरकोळ कारणांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची नाही अशा प्रतिक्रीया महिला देत आहेत.

Ladki bahin योजनेमुळे महिला घेताय व्यवसायात भरारी | Oneindia Marathi

साडेसात हजारांचे 15 हजार झाले

एका महिलेने यासंदर्भात सांगितले की, “माझे स्वतःचे आदित्य क्लाॅथ सेंटर आहे. तिथे मी कपड्यांचा व्यवसाय करते. त्या व्यवसायात मी माझी काही रक्कम आणि लाडकी बहिण योजनेतून जे काही पैसे मला मिळाले ते गुंतवले. याद्वारे मी साडेसात हजारांचे 15 हजार रुपये म्हणजेच दुप्पट रक्कम केली आहे असे या महिलेने सांगितले.”

“महायुती सरकारला धन्यवाद..”

कापड विक्रेत्या महिलेने हेही सांगितले की, “मी आज महायुती सरकारला खरोखर धन्यवाद देऊ ईच्छिते की, आपण सरकार म्हणून जो पर्याय आम्हा बहि‍णींना दिला म्हणजेच जी रक्कम सरकारने दिली त्याने मला फायदा झाला. महिलांसाठीच्या ज्याही योजना सुरु केल्या त्या खरोखरच आमच्यासाठीच आहेत. यापुढेही असेच आपण महायुती सरकार म्हणून लाडक्या बहि‍णींसाठी असेच काही चांगले प्रयत्न आपण करावे.”

लाडकी बहिण योजनेच्या पैशातून खरेदी केली इस्त्री, व्यवसायाला चालना

इस्त्री काम करणाऱ्या महिलेने लाडकी बहिण योजनेच्या पैशातून इस्त्री खरेदी केली आणि स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली.यासंदर्भात संबंधित महिला सांगते, “लाडकी बहिण योजनेतून मी इस्त्री घेतली. ही योजना अशीच पुढे सुरु ठेवावी, लाडक्या भावांकडून आम्हाला अजून काय हवे.” अशी मार्मिक प्रतिक्रीया या महिलेने दिली.

अनेक महिला बनल्या स्वावलंबी

याच नाही तर अशा अनेक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून अनेक छोटे- छोटे व्यवसाय उभारले आणि त्यातून चांगला नफाही मिळवल्याचे त्या सांगत आहेत. या योजनेमुळे महिला स्वावलंबी झाल्या आहेत.