भारताला जपानकडून दोन बुलेट ट्रेन गिफ्ट! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं 71% काम पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India Bullet Train Project : एप्रिल 2025 भारतात हायस्पीड बुलेट ट्रेनचं स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरचं 71% काम पूर्ण झालं असून, 2027 मध्ये या प्रकल्पाचा काही भाग प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे.

जपानकडून भारताला बुलेट ट्रेन गिफ्ट (India Bullet Train Project)

जपान भारताला E5 सीरीजच्या दोन बुलेट ट्रेन गिफ्ट स्वरूपात देणार असल्याची माहिती जपान टाइम्सने दिली आहे. या ट्रेनचा वेग 320 किमी/तास इतका असून, ती 2011 पासून जपानमध्ये वापरात आहे. भारतासाठीही हे सर्वात यशस्वी आणि चाचणी-तयार मॉडेल मानलं जातं आहे.

E10 भविष्याचा सुपर फास्ट मॉडल

जपान सध्या E10 बुलेट ट्रेन मॉडेलवर काम करत आहे, जे E3 आणि E5 सीरीजच्या तुलनेत अधिक प्रगत, वेगवान आणि हवामान सहन करणाऱ्या तंत्रज्ञानाने सज्ज असणार आहे. विशेष म्हणजे, भारत आणि जपान या दोन्ही देशांमध्ये E10 एकाचवेळी (India Bullet Train Project) ट्रॅकवर उतरवण्यात येणार आहे.

ट्रायलसाठी डेटा कलेक्शन

भारतातील गरम हवामान, धूळ आणि वातावरणीय बदल लक्षात घेऊन या ट्रेनची कार्यक्षमता तपासण्यासाठी विशेष ट्रायल्स राबवण्यात येणार आहेत. E3 आणि E5 सीरीजच्या डेटाच्या आधारे E10 मॉडेलला पुढे विकसित करण्यात येणार आहे.

360 किमी काम पूर्ण (India Bullet Train Project)

एकूण 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आजपर्यंत 360 किमी काम पूर्ण* झालं आहे. त्यामुळे 2027 च्या ऑगस्टपर्यंत काही मार्गावर सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असून, तो पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवास केवळ 2-3 तासांत शक्य होईल.

बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळत असला, तरी डहाणूच्या गोवने परिसरात स्थानिक नागरिक समस्यांचा सामना करत आहेत. रात्रीच्या वेळी उभारणीसाठी करण्यात येणाऱ्या भूसुरुंग स्फोटांमुळे घरांना तडे जाऊ लागले आहेत. काही नव्याने बांधलेली घरे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. नागरिकांनी याविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, प्रकल्प व्यवस्थापनाकडून तपासणी सुरू आहे.

भारताच्या हायस्पीड ट्रेन युगातल्या वाटचालीत जपानचा मोलाचा सहभाग आणि टेक्नॉलॉजिकल भागीदारी अधिक गडद होत आहे. जपानकडून मिळणाऱ्या बुलेट ट्रेन गिफ्ट्समुळे प्रकल्पाला वेग मिळेलच, पण त्याचबरोबर भारतीय हवामानात कार्यक्षमतेने चालणारी बुलेट ट्रेन बनवण्याचा प्रयोगही अधिक ठोस होणार आहे.