18 तासांचा प्रवास फक्त 7 तासांत! महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतून जाणार 14 पदरी ‘सुपर एक्सप्रेसवे’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai-Bangluru Highway: भारताची वाहतूकक्रांती नव्या उंचीवर! पोहचली आहे. मुंबईपासून बंगळुरूपर्यंतचा प्रवास जो सध्या 18 तास घेतो, तो अवघ्या 7 तासांत शक्य होणार आहे. हे शक्य होणार आहे 14 पदरी नव्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेमुळे, जो महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून जात कर्नाटकातील 9 जिल्ह्यांशी थेट जोडणारा असेल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या या सुपर हायस्पीड द्रुतगती मार्गाची लांबी 700 किलोमीटर असून यासाठी सुमारे 40 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग भारतमाला योजनेअंतर्गत (Mumbai-Bangluru Highway) विकसित करण्यात येणार आहे आणि तो 2028 पर्यंत नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये (Mumbai-Bangluru Highway)

14 पदरी महामार्ग: भारतातील सर्वात रुंद हायवेपैकी एक
18 ऐवजी 7 तासांत प्रवास: वेळ आणि इंधनाची मोठी बचत
10 नद्या पार करणारा मार्ग: कृष्णा, नीरा, तुंगभद्रा, घाटप्रभा यांसारख्या नद्यांवर पूल
55 फ्लायओव्हर + 22 इंटरचेंज + 2 इमर्जन्सी एअरस्ट्रिप्स: गती आणि सुरक्षा दोन्ही सुनिश्चित
ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट: पर्यावरणपूरक आणि नव्याने आखलेला मार्ग
पुणे रिंग रोड ते बंगळुरू सॅटेलाइट रिंग रोडपर्यंत थेट जोडणी

कोणते जिल्हे होणार लाभार्थी? (Mumbai-Bangluru Highway)

महाराष्ट्रात

  • पुणे
  • सातारा
  • सांगली
  • कर्नाटकमध्ये
  • बंगळुरू ग्रामीण
  • बेलगावी
  • बागलकोट
  • गदग
  • कोप्पल
  • विजयनगर
  • दावणगेरे
  • चित्रदुर्ग
  • तुमाकुरू नदीवरून पूल आणि निसर्गाचा अनुभव

या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना येरला, नीरा, कृष्णा, अग्रनी, तुंगभद्रा, मालाप्रभा अशा 10 प्रमुख नद्यांवरून पूल पार करता येणार आहेत. यामुळे प्रवास फक्त वेगवान नव्हे, तर निसर्गसंपन्न देखील होणार आहे.

व्यापार आणि पर्यटनाला गती

हा महामार्ग मल्टी-सिटी कनेक्टिव्हिटी वाढवणारा गेमचेंजर ठरणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, गुजरात आणि कर्नाटकातील औद्योगिक व व्यापार केंद्रांना थेट जोडल्याने आर्थिक घडामोडींना मोठा बूस्ट मिळणार आहे.

प्रकल्पाची संभाव्य पूर्णता

2028 पर्यंत हा महामार्ग सार्वजनिक वापरासाठी खुला होण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे भारतातील प्रवासाच्या गतीला नवसंजीवनी मिळणार आहे. तो केवळ एक रस्ता नाही, तर भविष्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासाचं महत्त्वाचं दालन ठरणार आहे.**