Mumbai Coastal Road: कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन; काय आहे वेग मर्यादा, कोणत्या वाहनांना बंदी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Coastal Road: मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पहिल्या टप्प्यामध्ये वरळी ते मारिन ड्राइव्ह या रस्त्याचा समावेश आहे. त्यामुळे आता धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मार्ग म्हणजेच मुंबई कोस्टल रोडचा काही भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आता वरळी ते मरीन ड्राइव्ह 10 मिनिटांत (Mumbai Coastal Road)

या रस्त्यामुळे वरळी ते मरीन ड्राइव्ह हा रास्ता केवळ 10 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. यापूर्वी हे आंतर पार करण्यासाठी 40 मिनिटे लागत होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वात: या रस्त्याची पाहणी केली होती. मुंबई कोस्टल रोडचे बांधकाम 13 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू झाले होते आणि हा प्रोजेक्ट अंदाजित 12,721 कोटी रुपये किमतीचा आहे.

कसा असेल प्रवास ?

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 10.5 किलोमीटर लांबीचा हा मार्ग वाहतुकीसाठी (Mumbai Coastal Road) खुला करण्यात येतोय . वाहनधारक वरळी सीफेस, हाजी अली इंटरचेंज आणि अमरसन इंटरचेंज पॉईंटवरून कोस्टल रोडमध्ये प्रवेश करू शकतात आणि मरीन लाइन्समधून बाहेर पडू शकतात.

या वेळात मार्ग खुला

याबाबत माहिती देताना एका अधिकृत वाहतूक अधिसूचनेत, मुंबई पोलिसांनी सांगितले की, जलद वाहतुकीसाठी बांधण्यात (Mumbai Coastal Road) आलेला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग (मुंबई कोस्टल रोड) खान अब्दुल गफ्फार खान रोड आणि बिंदू माधव ठाकरे जंक्शन ते मरीन ड्राईव्ह या मार्गावरील वाहन वाहतुकीसाठी अंशत: खुला केला जाईल. सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत वाहनांना परवानगी असेल. वाहने थांबवून वाहने बाहेर पडण्यास तसेच मार्गावरील छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे.

या वाहनांना प्रवेश बंदी

पहिल्या टप्प्यातील वरळी ते मारिन ड्रिव्ह दरम्यान, बेस्ट आणि एसटी बसेस वगळता (Mumbai Coastal Road) सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालवाहू वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि सर्व मालवाहतूक करणारी वाहने. सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल आणि अपंग व्यक्तींच्या मोटरसायकल आणि स्कूटर (साइडकारसह),सर्व प्रकारच्या तीनचाकी वाहने,जनावरांनी काढलेल्या गाड्या, टांगा आणि हातगाड्या, पादचारी यांना या मरगावरून प्रवेश नसेल.

वेग मर्यादा

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील वाहतुकीसाठी वाहनांवर वेगमर्यादा घालून देण्यात आली असून (Mumbai Coastal Road) सरळ रस्त्यावर – 80 किमी/तास बोगद्यात- 60 किमी/80 किमी/तास, वळणाच्या ठिकाणी आणि प्रवेश/निर्गमन बिंदू: 40 किमी/तास अशी वेग मर्यादा असेल.