Mumbai – Kolhapur Train : चला मुंबई-कोल्हापूर सुसाट…! मध्य रेल्वेकडून अतिजलद विशेष ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai – Kolhapur Train : मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या मर्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्यरेल्वेने मुंबई ते कोल्हापूर (Mumbai – Kolhapur Train) या मार्गावर विशेष ट्रेन सुरु केली आहे. या गाडीची वाहतूक एकेरी असेल शिवाय ही गाडी अतिजलद असेल यामुळे याचा शुल्कही नेहमीच्या गाडीपेक्षा वेगळा असणार आहे.

कधी सुटणार विशेष रेल्वे (Mumbai – Kolhapur Train)

मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक २० फेब्रुवारीपासून ही गाडी सुरु होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर दरम्यान अतिजलद एकेरी विशेष गाडी क्रमांक (01099) ही मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता ती कोल्हापुरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला (Mumbai – Kolhapur Train) पोहचणार आहे.

कधीपासून करू शकाल आरक्षण ?

या गाडीला १७ डबे जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आजपासुन आरक्षण सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांनी विशेष रेल्वे (Mumbai – Kolhapur Train) सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कुठे घेणार थांबे

कोल्हापूर ते मुंबई दरम्यान अनेक स्थानकांवर सुद्धा प्रवाशांची वाढती संख्या (Mumbai – Kolhapur Train) लाक्षात घेता ही विशेष रेल्वे दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर येथे थांबणार आहे.