Mumbai Local : महत्वाची बातमी ! मध्य रेल्वेवर 6 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, ‘या’ वेळेत धावतील लोकल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local : मुंबईमध्ये मुंबईची लोकल ही प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आजपासून म्हणजे दिनांक 6 आणि 7 एप्रिल ते दिनांक 11 एप्रिल आणि १२ एप्रिल या कालावधीमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठरलेल्या कालावधीत हा ट्राफिक ब्लॉक मध्यरात्रीनंतर घेण्यात (Mumbai Local) येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी आरओबी गर्डर टाकण्याच्या कामाकरिता मध्य रेल्वेच्या घाटकोपर भांडुप दरम्यान विशेष वाहतूक आणि पावर ब्लॉक घेण्यात येणार आहेत अशी माहिती रेल्वे कडून प्रसारित करण्यात आली आहे.

यामुळे नेहमीप्रमाणे धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. मध्य रेल्वेचा ऑफ आणि डाऊन केला मार्गावर विशेष वाहतूक पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान घाटकोपर व भांडुप स्थानाचा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लेवल क्रॉसिंग क्रमांक 14 सी च्या ठिकाणी विक्रोळी येथे आरओबीचा गर्डर टाकण्यासाठी पाचव्या आणि सहाव्या मार्गीकांवर (Mumbai Local) पुढील प्रमाणे ब्लॉक घेण्यात येणार आहे.

१) ब्लॉक दिनांक: दि. ०६/०७.०४.२०२४ (शनिवार/रविवार रात्री)

ब्लॉक कालावधी: ०१:२० ते ०४:०५ (०२.४५ तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: अप व डाऊन धीमे मार्ग; अप आणि डाऊन जलद मार्ग आणि कांजूरमार्ग व घाटकोपर दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर.

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन/शॉर्ट टर्मिनेशन
१. 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ठाणे येथे समाप्त असेल.

२. 18030 शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनसचे योग्य वेळी नियमन केले जाईल.

३. 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दादर येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

४. 18519 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ०३.४९ ते ०४.०५ पर्यंत ठाणे येथे निर्गमित केली जाईल व नियोजित आगमनाच्या २० मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचेल.

५. 12134 मंगळुरु- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस निळजे येथे ०३.३२ ते ०४.१० या वेळेत निर्गमित केली जाईल व नियोजित आगमनाच्या ५० मिनिटे उशिराने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

लोकलचा अल्प कालावधी:
१. T 151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कुर्ला गाडी २३.५७ वाजता धावेल.
२. T2 ठाणे करिता कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल.

2) ब्लॉक दिनांक: दि. ०७/०८.०४.२०२४ (रविवार/सोमवार रात्री)

ब्लॉक कालावधी: ०१:२० ते ०४:३० (०३.१० तास)
ट्रॅफिक ब्लॉक विभाग: अप आणि डाऊन धीमे मार्ग; अप आणि डाऊन जलद मार्ग आणि कांजूरमार्ग व घाटकोपर दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर.

उपनगरीय गाड्यांचा अल्प कालावधी:

  1. T 151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कुर्ला जाणारी २३.५७ वाजता धावेल.
  2. T2 ठाणे येथून कुर्ला करीता ०४.०० वाजता सुटेल.
  3. T3 ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०५.१६ वाजता धावेल. या लोकल रद्द
  4. T4 ठाणे येथून ०४.१६ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी रद्द राहील.
  5. T6 ठाणे येथून ०४.४० वाजताची रद्द राहील.

लोकल या मार्गावर वळवण्यात येणार (Mumbai Local)

S2 आणि A2 मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, जे भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला व शीव स्थानकावर थांबतील.

3) ब्लॉक दिनांक: दि. ०८/०९.०४.२०२४ (सोमवार/मंगळवार रात्री)


ब्लॉक कालावधी: ०१:२० तास ते ०४:३० तास (०३.१० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: अप आणि डाऊन धीमे मार्ग; अप आणि डाऊन जलद मार्ग आणि कांजूरमार्ग व घाटकोपर दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर.

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण:
ट्रेन 11020 भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12134 मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12702 हैदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 11140 गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ठाणे आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान ६व्या मार्गिकेवर वळवण्यात येतील.

४) ब्लॉक दिनांक: दि. ०९/१०.०४.२०२४ (मंगळवार/बुधवार रात्री)


ब्लॉक कालावधी: ०१:२० तास ते ०४:३० तास (०३.१० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: अप आणि डाऊन धीमे मार्ग; अप आणि डाऊन जलद मार्ग आणि कांजूरमार्ग व घाटकोपर दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर.

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण:
ट्रेन १२१०२ शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 18030 शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 18519 विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस व 20104 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ठाणे आणि विद्याविहार (Mumbai Local) स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

५) ब्लॉक दिनांक: दि. १०/११.०४.२०२४ (बुधवार/गुरुवार रात्री)


ब्लॉक कालावधी: ०१:२० तास ते ०४:३० तास (०३.१० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: अप आणि डाऊन धीमे मार्ग; अप आणि डाऊन जलद मार्ग आणि कांजूरमार्ग आणि घाटकोपर दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गावर.

उपनगरीय गाड्यांचा अल्प कालावधी:

  1. T 151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डिप कुर्ला पर्यंत २३.५७ वाजता धावेल.
  2. T2 ठाणे डेपोतून कुर्ल्याला ०४.०० वाजता सुटेल.
  3. ठाणे ते ३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेपो ०५.१६ वाजता धावेल. उपनगरीय गाड्या रद्द: (Mumbai Local)
  4. T4 ठाणे डेपो ०४.१६ वाजता रद्द राहील.
  5. T6 ठाणे डेपो ०४.४० वाजता रद्द राहील. उपनगरीय गाड्यांचे वळण:

S2 आणि A2 मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान यूपी जलद मार्गावर वळवण्यात येईल, जे भांडुप, विक्रोळी, घकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील.

६) ब्लॉक दिनांक: दि. ११/१२.०४.२०२४ (गुरुवार/शुक्रवारी रात्री)


ब्लॉक कालावधी: ०१:२० तास ते ०४:३० तास (०३.१० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: वर आणि खाली धीमे मार्ग; अप आणि डाऊन जलद मार्ग आणि कांजूरमार्ग आणि घाटकोपर दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गावर.

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण (Mumbai Local)

गाड्या 11020 भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12134 मंगळुरु-सीएसएमटी एक्सप्रेस, 12132 साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस, 12702 हैदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 11140 गदग-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ठाणे ते विद्याविहार ६व्या मार्गिकेवर (Mumbai Local) वळवण्यात येतील.