Mumbai Local Mega Block : होळी आणि मेगाब्लॉक एकाच दिवशी ! वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local Mega Block : उद्या (24) होळीच सण आहे. संपूर्ण देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. उद्या रविवारी सुट्टी असल्याने तुम्ही जर होळीच्या निमित्ताने कुठे बाहेर जायचं प्लॅन करत असाल तर आधी हे रेल्वेचे वेळापत्रक पहा कारण मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या कडून मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकलने तुम्ही प्रवास करणार असाल तर आधी हे वेळापत्रक पहा आणि नंतरच बाहेर पडा. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी हा मेगा ब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेतला जाणार आहे. यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत.

मध्य रेल्वे (Mumbai Local Mega Block)

माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी ३:५५ पर्यंत आहे तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी १०:१४ ते दुपारी ३:१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदमान लोकल थांबतील. नंतर डाऊन धीम्या मार्गावर वाळवण्यात येतील. पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

ठाणे इथून सकाळी १०:५८ ते दुपारी ३:५९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल मुलुंड येथे जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शिव येथे मुलुंड आणि माटुंगा रेल्वे (Mumbai Local Mega Block) स्थानकात दरम्यान थांबून लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे पंधरा मिनिटे उशिरा धावतील.

हार्बर मार्ग (Mumbai Local Mega Block)

या लोकल सेवा रद्द

सकाळी 10:34 ते दुपारी ३:३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी, बेलापूर, पनवेल साठी डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी१०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी (Mumbai Local Mega Block) महाराज टर्मिनस येथून ही लोक सकाळी १०:१८ वाजता सुटेल ब्लॉक नंतरची पहिली लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हे लोकल दुपारी 3:44 वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल पनवेल इथून सकाळी १०:५ वाजता सुटेल ब्लॉक नंतर ची पहिली लोकल पनवेल इथून दुपारी ३:४५ वाजता सुटेल.

पश्चिम रेल्वे (Mumbai Local Mega Block)

पश्चिम रेल्वेच्या बाबतीत बोलायचं झालं तर पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना उद्याच्यासाठी दिलासा मिळणार आहे.

डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल टिटवाळा लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी 9:53 ला सुटेल ब्लॉक नंतरची पहिली लोकल आसनगाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी 3:32 वाजता सुटेल

अप धीम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल आहे. ठाणे येथून ती सकाळी १०:२७ वाजता सुटेल ब्लॉक नंतर पहिली लोकल कल्याण लोकल आहे ठाणे येथून ते दुपारी ४:०३ वाजता सुटेल.