Mumbai Local Megablock : उद्या 3 मार्चला पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे लाईनवर मेगाब्लॉक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local Megablock : जर तुम्ही उद्या लोकल ट्रेन ने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. उद्या रविवार दिनांक ३ मार्च रोजी मुंबईच्या मध्य पश्चिम आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे विभागाकडून अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे घरातून बाहेर निघण्यापूर्वी रेल्वेचे (Mumbai Local Megablock) हे वेळापत्रक नक्की चेक करा आणि मग बाहेर पडा.

हार्बर

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी दहा ते दुपारी ४:३० या कालावधीत ट्रान्स हार्बर किंवा मुख्य मार्गावर प्रवास करण्याची मुभा आहे. ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी दहा वाजून 18 मिनिटांनी सुटेल. ब्लॉक (Mumbai Local Megablock) नंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी डोंबिवली साठी सुटणार आहे. अप लाईनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल. ब्लॉक नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पहिली लोकल ठाण्याहून दुपारी तीन वाजून 36 मिनिटांनी सुटेल.

हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेल साठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी दहा वाजून 14 मिनिटांनी सुटेल. वाशीसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी दहा वाजून 18 मिनिटांनी सुटेल. ब्लॉक नंतर पनवेल साठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी तीन वाजून 36 मिनिटांनी सुटेल. अप हार्बर लाईन वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी दहा वाजून 33 मिनिटांनी सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉक (Mumbai Local Megablock) नंतर पहिली लोकल वाशी येथून दुपारी चार वाजून 19 मिनिटांनी सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉक नंतर पहिली लोकल पनवेल इथून सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे.

मध्य रेल्वे

रेल्वे कडून प्रसारित करण्यात आलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्या विहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी दहा 55 ते दुपारी तीन 55 पर्यंत ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी दहा 48 ते दुपारी तीन 49 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्या विहार स्थानकांत दरम्यान जलद मार्गावरून वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकादरम्यान या लोकल थांबतील आणि त्यानंतर त्या डाऊन धीमी (Mumbai Local Megablock) मार्गावर वाळवण्यात येतील. तसेच घाटकोपर इथून सकाळी 10:41 ते दुपारी तीन 52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांतरमॅन अप जलद मार्गावर वळविण्यात येईल. कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर या लोकल थांबतील मानखुर्द ते नेरुळ दरम्यान ऑफ आणि डाऊन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11:15 दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वे (Mumbai Local Megablock)

शनिवारी किंवा रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच दोन आणि तीन मार्च 2024 रोजी सांताक्रुज आणि माहीम स्थानकां दरम्यान रात्री बारा वाजून 30 मिनिटांनी ते सकाळी चार वाजून 30 मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चार तासांचा जम्बो ब्लॉक (Mumbai Local Megablock) घेतला जाईल अशी माहिती पश्चिम रेल्वे कडून देण्यात आली आहे. ब्लॉक दरम्यान अप स्लो मार्गावरील काही गाड्या अंधेरी आणि चर्चगेट दरम्यान जलद मार्गावर धावल्या जातील. त्यामुळे या धीम्या गाड्या अंधेरी वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांत दरम्यान जलद धावतील. रविवार दिनांक 3 मार्च रोजी पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावर दिवसा ब्लॉक असणार नाही.