Mumbai Local Train Mega Block : मुंबईकरांनो…! रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ; पहा वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local Train Mega Block : मुंबईची धमणी म्हणून ओळख असलेली मुंबईची लोकल रेल्वे रविवारी मात्र थोडी विलंबाने धावणार आहे. दररोज हजारो मुंबईकर लोकल ने प्रवास करीत असतात. तुम्ही देखील रविवारी (14-1-24) रोजी लोकलने प्रवास करण्याचा विचार करीत असाल तर थांबा … आधी रेल्वेचे वेळापत्रक पहा कारण मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक (Mumbai Local Train Mega Block) असणार आहे. त्यामुळे काही गाड्या विलंबाने तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कधी असेल मेगाब्लॉक ?

मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री 11:40 ते रविवारी पहाटे 3:40 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर वर रविवारी सकाळी 11 ते दुपारी चार पर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहील. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर ही रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मेगाब्लॉक (Mumbai Local Train Mega Block) घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मार्ग आणि ब्लॉक

मध्य रेल्वे हार्बर चा विचार करता मध्य रेल्वे हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अपडाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल. याशिवाय मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या सहाव्या मार्गावर शनिवारी रात्र कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक (Mumbai Local Train Mega Block) नसेल असे रेल्वे कडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय पश्चिम आणि हार्बर वर घेण्यात येणाऱ्या ब्लॉगच्या वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही लोकल विलंबन धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे वरील ब्लॉकच्या वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वाळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत

पश्चिम रेल्वे

स्थानक -सांताक्रुज ते गोरेगाव
मार्ग- आणि डाऊन जलद
वेळ- सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे वरील वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे (Mumbai Local Train Mega Block) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी बेलापूर पनवेल अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. सीएसएमटी ते गोरेगाव लोकल वेळापत्रकानुसार धावतील तर पनवेल आणि मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे

स्थानक – वडाळा रोड ते मानखुर्द
मार्ग- अप आणि डाऊन
वेळ – सकाळी 11 ते दुपारी चार पर्यंत.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे (Mumbai Local Train Mega Block) पाचव्या आणि सहाव्या मार्गी के वरील मेल एक्सप्रेस जलद ऑफ डाऊन मार्गावरून चालवण्यात येणार आहेत यामुळे मेल एक्सप्रेस 15 ते 20 मिनिटं विलंबाने धावणार आहेत. तर रात्रकालीन ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कल्याण दरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे

स्थानक -ठाणे ते कल्याण
मार्ग – पाचवी आणि सहावी मार्गिका
वेळ शनिवारी रात्री 11:40 ते रविवारी पहाटे 3:40.