Mumbai Local Train : मुंबई लोकलची कनेक्टिव्हिटी वाढणार ; 5 नवी स्थानके उभारली जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Mumbai Local Train : मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची धामणी आहे. मुंबईची ही लोकल दररोज हजारो लोकांना आपल्या निश्चित ठिकाणी पोहचवत असते. मुंबई शहराच्या आजूबाजूच्या भागांमध्ये देखील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे मुंबईच्या लोकलची कनेक्टिव्हिटी वाढवणे ही आताची गरज आहे. म्हणूनच रेल्वेच्या अनेक येऊ घातलेल्या प्रकलपांमध्ये मुंबईची कनेक्टिव्हिटी (Mumbai Local Train) वाढवणारे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातच लोकल गाड्याच्या विस्तारीकरणासाठी पनवेल-कर्जत हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून या नव्या कॉरिडॉरसाठी बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) 3 च्या या प्रकल्पात पनवेल ते कर्जत दरम्यान 29.6 किमी लांबीचा कॉरिडॉर बांधला जातो आहे.

3 किमीचे तीन बोगदे

पनवेल ते कर्जत प्रकल्पाचे मुख्य वैशिट्य म्हणजे 3 किलोमीटरचे तीन बोगदे. नधाळ बोगदा,वावेर्ली बोगदा आणि किरवली बोगदा (Mumbai Local Train)
या प्रकल्पाचा एक भाग म्हणून एकूण 3,144 मीटर लांबीचे तीन बोगदे बांधण्यात येणार आहेत. बोगदा-1 साठी वॉटर प्रूफिंग आणि काँक्रीट अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बॅलास्ट-लेस ट्रॅकचे काम सुरू आहे.प्रकल्पातील सर्वात लांब असलेल्या वेव्हरली बोगद्यासाठी (Mumbai Local Train) सध्या 2,038 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. सध्या मालवाहू गाड्यांव्यतिरिक्त, काही लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या सध्याच्या पनवेल, खालापूर आणि कर्जत या कॉरिडॉरवर धावतात.

  • 219 मीटर लांबीचा बोगदा-1 (नधाळ बोगदा) खोदण्यात आला आहे.
  • 2,625 मीटर लांबीचा बोगदा-2 (वावेर्ली बोगदा)
  • 300 मीटर लांबीचा बोगदा-3 (किरवली बोगदा) चे काम सुरू आहे.

पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे फायदे (Mumbai Local Train)

  • या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील रायगड जिल्ह्याचे क्षेत्र कर्जतला जोडला जाईल आणि एमएमआरचा विस्तारहोईल
  • यामुळे मुंबई (Mumbai Local Train) लोकलला शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देखील मिळेल आणि पनवेल आणि कर्जत दरम्यान नवीन कॉरिडॉरसह विकास होईल.
  • नवीन कॉरिडॉरमध्ये पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असतील.
  • डिसेंबर 2025 हा प्रकल्प पूर्णत्वास येण्याची मुदत आहे.