Mumbai Metro : मेट्रोने जोडली जाणार कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई ; वाढणार कनेक्टिव्हिटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Metro : राज्यामध्ये अनेक विकासात्मक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग शिवाय मेट्रोचे जाळे सुद्धा अनेक शहरांमध्ये विस्तारत आहे. याचाच एक भाग म्हणजे कल्याण-तळोजा मेट्रो लाईन ( Mumbai Metro ) होय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी डोंबिवलीतील प्रीमियर मैदानावर मुंबई मेट्रो लाईन-12 (कल्याण-तळोजा) ची पायाभरणी केली. कल्याण-तळोजा विभाग (लाइन-12) हा मुंबई मेट्रो लाईन 5, ऑरेंज लाईनचा विस्तार आहे. या विस्तारामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ कमी होणार आहे.

याच्यापूर्वी ही मार्गिका कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पासून ते तळोजापर्यंत होती मात्र तळोजापासून 4 किलोमीटर अंतरावर नवी मुंबई मेट्रोचे पेनधर हे अखेरचे स्थानक आहे. त्यामुळे आधीची मूळ बांधकाम निविदा रद्द करून नव्याने आरेखन करण्यात आलं. याद्वारे ही मार्गिका ( Mumbai Metro ) कल्याण बाजार समिती ऐवजी कल्याण स्थानक पूर्व येथून सुरू होऊन तळोजा ऐवजी पेनधर जवळील अमनदूत या स्थानकापर्यंत विस्तारण्यात आली आहे. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विनाविलंब प्रवेश देण्यासाठी हा विस्तार प्रस्तावित करण्यात आला होता. मेट्रो लाइन-12 ही कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे.

मुंबई मेट्रो लाईन -12 बद्दल महत्वाचे मुद्दे (Mumbai Metro)

  • 22.173 किमी लांबीच्या पट्ट्यात 19 स्थानके असतील.
  • प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे 5,865 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • या मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या 2.50 लाखांपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे.
  • हा प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण (Mumbai Metro) होण्याचा अंदाज आहे.
  • कल्याण-डोंबिवली-तळोजा मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल येथील प्रवाशांना फायदा होईल.
  • कल्याण ते तळोजा प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांनी कमी होणार आहे.
  • इंडियन एक्स्प्रेसमधील एका वृत्तानुसार, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली दरम्यान सुरळीत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी नवी मुंबई मेट्रो स्टेशनवर मेट्रो लाइन-12 चे नवी मुंबई मेट्रो लाइनसह एकीकरण देखील प्रस्तावित आहे.
  • मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने या मार्गावर प्रवासी संख्या (Mumbai Metro) आणि मागणीनुसार 3-कोच किंवा 6-कोच गाड्या चालवणे अपेक्षित आहे.
  • हा विस्तारित मार्ग शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातून जातो, त्यामुळे या भागांना भविष्यात विकासाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.