Mumbai Metro : सुरु होणार मुंबई ते अलिबाग मेट्रो प्रवास ; मार्गावर 40 स्थानकांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Metro : राज्याची आर्थिक राजधानी मुंबईची कनेक्टिव्हिटी चांगलीच जोर पकडत आहे. आधी अटल सेवा सेतू , नंतर कोस्टल रोड आणि आता मुंबई मेट्रोचा सुद्धा विस्तार होणार आहे. मुंबई मेट्रो सुरु झाल्यानंतर मुंबईकरांना आता प्रवासाचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. केवळ मुंबई शहरच नव्हे तर मुंबईच्या (Mumbai Metro) उपनगरांमधून सुद्धा मेट्रो सुरु झाली आहे. यापूर्वी अलिबागला जायचं म्हटलं की जेट्टीचा प्रवास सोपा वाटत होता. मात्र आता मुंबईतून अलिबागला सुसाट जाता येणार आहे कारण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विरार-अलिबाग या मार्गावर नायगाव ते अलिबाग अशा साधारण 136 किमीच्या मेट्रो मार्गिकेसाठीचा निरीक्षणपर अभ्यास सुरु केला आहे.

मार्गावर 40 स्थानकांचा समावेश (Mumbai Metro)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येणारे सहा महिने हे मेट्रो मार्गिकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या दरम्यान 40 स्थानके असतील शिवाय मेट्रोमार्गाशी नवी मुंबई (Mumbai Metro) आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए जोडण्यात येईल. MSRDC कडून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी भूसंपादन निविदा प्रक्रिया आहे आता अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय वसईतील नायगाव ते अलिबाग पर्यंतच्या या मेट्रोच्या स्थानकांमध्ये भविष्यात आणखी वाढ होणार असून ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची मेट्रो ट्रेन या प्रस्तावित मेट्रो मार्गीतेचा फायदा मुंबई विरार पट्ट्यासह भिवंडी कल्याण पनवेल उरण पेन आणि अलिबाग या भागांना होणार आहे.

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच अॅक्वा मेट्रो (Mumbai Metro)

मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 3 ही सेवाही रुजू होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार ही शहरातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो असून तिला अॅक्वा मेट्रो असंही म्हटलं जात आहे. या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील आरेपासून बीकेसीपर्यंतच्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं असून, बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील काम आता अखेरच्या टप्प्यात असेल असं सांगण्यात येत आहे.