Mumbai News : गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यामुळे वाहतूक कोंडी फुटणार; काही मिनिटात पूर्ण होणार प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai News :खरंतर मुंबई मधला प्रवास म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या आणि वेटिंग असा समज झाला आहे. मात्र सध्या मुंबईमध्ये वेगवेगळे रस्ते प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये कोस्टल रोड सह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. अशा अनेक प्रकल्पांचा समावेश यामध्ये आहे. ज्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय नागरिकांचा वेळही वाचणार आहे. अशातलाच एक रस्ता म्हणजे गोरेगाव मुलुंड रस्ता. मुंबईतील वाहतूक कोंडीला पर्याय देण्यासाठी गोरेगाव – मुलुंड लिंक रोड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पात गोरेगाव पूर्व इथून 4.70 किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत जुळे बोगदेही असणार आहेत. (Mumbai News) त्यामुळे प्रवास झटपट होण्यास मदत होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बोगद्यांच्या कामासाठी मुंबई पालिकेला कार्यादेश दिले असून सध्या प्राथमिक सर्वे सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास वाहतूक कोंडीतून (Mumbai News) सुटका होणार आहेत. प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. या प्रकल्पाचे काम हे चार टप्प्यात करण्यात येत असून यातील टप्पे हे पुढील प्रमाणे आहेत.

पहिला टप्पा– पहिला टप्पा हा नाहूर येथून रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचा आहे. याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

दुसरा टप्पा – हा गोरेगाव मुलुंड जोड रस्ता रुंदीकरणाचा आहे. याचं 85 टक्के काम पूर्ण झालं असून मुलुंड पश्चिमचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

तिसरा टप्पा – हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या टप्प्याच्या अंतर्गत रत्नागिरी हॉटेल जंक्शन गोरेगाव पूर्व येथील 1.26 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल खिंडीपाना तानसा जलवाहिनी इथे नाहोर येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलापर्यंत 1.89 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल आणि जी जी सिंग रोड व गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प इथं त्रिस्तरीय चक्रीय मार्ग तसेच मुलुंड पश्चिम मधील हेडगेवार जंक्शन येथे उड्डाणपूल (Mumbai News) बांधण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्याचे 22 टक्के काम पूर्ण झाले आहे.

शेवटचा आणि चौथा टप्पा – हा 1.6 किलोमीटरचा गोरेगाव मधील पेटी बोगदा आणि 4.7 km चा गोरेगाव पूर्व मधील जोड बोगदाचे काम जारी आहे. याचा कार्यादेश जारी करण्यात आला असून याबाबतचा प्राथमिक सर्वे सुरू आहे. गोरेगाव मुलुंड (Mumbai News) प्रकल्पाच्या कामासाठी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम दहा टक्क्यांपर्यंत पूर्ण झाला आहे

काय आहेत प्रकल्पची वैशिष्ट्ये

  • या प्रकल्पात 4.70 किलोमीटर लांबीचे दोन जुळे बोगदे असतील. ज्यामध्ये तीन मार्गीका असतील.
  • देशातील सर्वाधिक लांबीचे हे बोगदे आहेत.
  • हे काम पाच वर्षात पूर्ण केलं जाईल.
  • दोन बोगदे करताना संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या काही भागांच्या खालून हा बोगदा (Mumbai News) जाणार आहे.
  • वीस ते पंचवीस मीटर आणि जास्तीत जास्त 100 मीटर खोलवर हे बोगदे होतील या अभयारण्याचा काही भाग येत असला तरीही त्याला कोणताही धक्का न लागता हे काम होणार आहे.