Mumbai Police : आले रे आले मुंबई पोलीस!! खाकी वर्दीच्या दमदार कामगिरीला खास गाण्यातून सलाम; Video पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Police) ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय..’ या ब्रीद वाक्याला आयुष्याचे ध्येय बनवून महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कायम नागरिकांचे रक्षण करत असतात. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ. सण- वार, सोहळे- उत्सव, घरगुती कार्यक्रम, ऊन- वारा- पाऊस काहीही न पाहता २४ तास जनतेच्या सेवेत हजर असणाऱ्या पोलिसांचे आयुष्य शब्दांत सांगण्यासारखे नाही. कारण वैयक्तिक आयुष्य बहाल करून जनतेच्या रक्षणासाठी आणि आपल्या कर्तव्यासाठी हे पोलीस कायम तत्पर असतात.

पोलिसांची खाकी वर्दी त्यांना स्वतःची सुख- दुःख बाजूला ठेवून नागरिकांची सेवा करण्याचे बळ देते. अशा या कार्यतत्पर मुंबई पोलिसांच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी नुकतेच एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. (Mumbai Police) मुंबई पोलिसांनी हा खास व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात मुंबई पोलिसांच्या उत्तम कामगिरीची एक झलक दाखवण्यात आली आहे. ‘आले रे आले मुंबई पोलिस’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात विविध श्रेणीतील पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाची झलक दाखवली आहे.

काय दाखवलंय गाण्यात? (Mumbai Police)

या व्हिडिओत पुरुष आणि महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई पोलिस नागरिकांना कशी मदत करतात आणि कामाचे नेमके महत्व काय हे पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला आहे. हे दृश्य अशा पद्धतीने चित्रित केलं आहे की, क्षणभर आपण केलेल्या चुका देखील डोळ्यासमोरून जातील. (Mumbai Police) कळत नकळत आपण अनेकदा अशा चुका करतो ज्यामुळे सामाजिक नुकसान होते. मात्र मुंबई पोलीस या चुका टाळता याव्या म्हणून कायम मदत करत असतात असे यातून दाखवण्यात आले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

या व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक विनाहेल्मेट प्रवास करणारा माणूस ट्रॅफिक पोलिसाला फसवून पुढे निघून जातो. पण पुढे गेल्यानंतर त्याचा अपघात होतो आणि यावेळी तेच ट्रॅफिक पोलिस त्याच्या मदतीला येतात. तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो हात जोडतो. (Mumbai Police) तसेच आणखी एका दृश्यात रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणांना निर्भया पथक वेळेत इंगा दाखवतात असे दाखवले आहे. शिवाय या गाण्यातून हरवलेल्या लहान मुलांना पालकांपर्यंत सुखरूप पोहोचवणे, सोनसाखळी चोरांना पकडणे यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस आहेत, याची जाणीव करून देण्यात आली आहे.

कुणी बनवलं?

मयूर राणे यांनी ‘आले रे आले मुंबई पोलिस’ हे गाणे तयार केले आहे. (Mumbai Police) या गाण्यात भायखळा पोलीस स्टेशनची एक झलक दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ मुंबई पोलिस यांच्या mumbaipolice या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आशा आहे हे खास गाणं ऐकल्यानंतर तुमच्याही मनात अभिमानाची भावना निर्माण होईल, जशी आमच्यामध्ये निर्माण झाली आहे’. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याला आणि व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे. तसेच यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Mumbai Police)