Mumbai – Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 3 दिवसांसाठी बंद ; जाणून घ्या पर्यायी मार्ग

0
1
Mumbai-Pune Expressway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mumbai – Pune Expressway – जे प्रवासी मुंबई-पुणे असा प्रवास करत असतील , त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचे गर्डर्स बसविण्यासाठी तीन दिवस वाहतूक ब्लॉक करण्यात येणार आहे. जर तुम्ही मुंबई आणि पुण्याला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 22 ते 24 जानेवारी दरम्यान, दुपारी 12 ते 3 या वेळेत एक्सप्रेसवेवर ब्लॉक केले जाणार आहे. तर चला या बातमीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

पुलाचे गर्डर बसवण्याचे काम सुरू –

मुंबई लेनवर लोणावळा येथील डोंगरगाव/कुसगांव भागात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पुलाचे गर्डर बसवण्याचे काम सुरू होणार आहे. या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. ब्लॉक कालावधीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक जुना पुणे-मुंबई महामार्ग व देहूरोड मार्गे वळवली जाणार आहे. तरी सर्व प्रवाशांनी याची माहिती घेऊनच प्रवास करायचा आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग (Mumbai – Pune Expressway) –

दुपारी 12 ते 3 दरम्यान वाहतूक वळवण ते वरसोली टोल नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळवली जाईल. दुपारी 3 नंतर वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरून सोडण्यात येईल.

वाहतूक या कालावधीत नेहमीप्रमाणे सुरू –

पुण्याहून मुंबईकडे (Mumbai – Pune Expressway) जाणारी वाहतूक या कालावधीत नेहमीप्रमाणे सुरू राहील. वाहनचालकांनी ब्लॉक कालावधीनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. काही अडचण असल्यास, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 किंवा महामार्ग पोलिस विभागाचा 9833498334 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींना या तारखेपासुन 2100 मिळणार: विखे पाटलांनी सांगूनच टाकलं

भारतातील 3 सर्वोत्तम MBA कॉलेज : अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती