mumbai pune expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग होणार आठपदरी ; सरकारकडे प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

mumbai pune expressway : मुंबई -पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई -पुणे (mumbai pune expressway) द्रुतगती महामार्ग आठ पदरी होणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वारंवार प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यार तोडगा काढण्यासाठी या मार्गाचे आठ पदरीकरण केले जाणार आहे. यासाठी ५५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांने याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती आहे.

म्हणून आठपदरीकरणाची गरज

सध्या असणारा मुंबई पुणे (mumbai pune expressway) महामार्ग हा 94 किलोमीटर लांबीचा आहे. 2002 साली या महामार्गाची उभारणी करण्यात आली होती. मागच्या काही वर्षांमध्ये मुंबई ते पुणे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे हा सहा पदरी मार्ग अपुरा पडत आहे. सध्या या महामार्गावरून प्रत्येक दिवशी जवळपास दीड लाख वाहन प्रवास करतात.

आता अटल सेतू मुळे मुंबई – पुणे अंतर आणखी जवळ आले आहे त्यातून मुंबई – पुणे (mumbai pune expressway) वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर एम एस आर डी सी कडून आठ पदरीकरणाचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी चार मार्गिका उपलब्ध होणार आहेत.

महामार्गावर बोगद्यांचा समावेश (mumbai pune expressway)

मुंबई ते पुणे (mumbai pune expressway) दरम्यान 70 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा विस्तार केला जाणार आहे त्यामध्ये कामशेत इथे दोन बोगदे तसंच माडप आणि भातन इथं बोगद्यांचा ही समावेश केला जाणार आहे त्यासाठी जवळपास 100 हेक्टर जागा अधिक्रहित करावी लागणार असून हा खर्च 600 कोटी रुपये अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या आठ पदरीकरणाचे काम सुरू केले जाईल त्यानंतर चार वर्षाच्या कालावधीत आठ पदरीकरणाचे काम पूर्ण केलं जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.