Mumbai-Pune Railway: देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. तर त्या पाठोपात सर्वात झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणजे पुणे. पुणे मुंबई असा दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. त्यामुळे पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे हे अंतर कमीत कमी कसं होईल? यासाठी नवनवीन विकास प्रकल्प शासनाकडून हाती घेतले जात आहेत.
दरम्यान पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा ट्रेन ने सफर करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवीन रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामुळे काय होणार आहे ? तर लोणावळा शिवाय रेल्वे प्रवाशांना थेट पुणे गाठता येणार आहे. नव्या मार्गावर मेल एक्सप्रेस चा वेग दुप्पट होणार आहे. त्यामुळे वेगाने पोहोचता येणार आहे. शिवाय या मार्गावर नव्या 10 रेल्वे गाड्या चालवण्याचा पर्यायही खुला राहणार आहे चला जाणून (Mumbai-Pune Railway) घेऊया मध्य रेल्वेच्या या नव्या प्रस्तावाबाबत…
तसे पाहायला गेले तर मुंबई ते पुणे दरम्यान रेल्वे मार्गामध्ये लोणावळा आणि खंडाळा हे घाट आहेत. प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घाटामध्ये ताशी 60 किलोमीटर अशी वेगमर्यादा मेल एक्सप्रेसला आहे. तर नव्या प्रस्तावित असलेल्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वे गाड्या ताशी 110 किलोमीटर वेगाने धावू शकणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मार्गांचा प्रस्ताव (Mumbai-Pune Railway) तयार करण्यात आलाय. यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यानंतर त्याचं काम सुरू करण्यात येणार आहे.
कसा असेल मार्ग (Mumbai-Pune Railway)
मिळालेल्या माहितीनुसार कर्जत ते तळेगाव दरम्यान ७२ किलोमीटरच्या नव्या मार्गावर घाटातील ग्रॅडियंट 1.100 होणाऱ्या सध्या लोणावळा घाटात 1.37 ग्रेडियंट होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. कर्जत ते तळेगाव हे अंतर 57 km असून नव्या मार्गात अंतर 72 किलोमीटर पर्यंत पोहोचेल. कर्जत ते कामशेत दरम्यान सध्या 44 किलोमीटर अंतर असून या नव्या मार्गानुसार 62 किलोमीटर अंतर असणार आहे. घाटाऐवजी पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्यानं नव्या मार्गात अंतर अधिक आहे. मात्र नव्या मार्गावरून जादा (Mumbai-Pune Railway) स्पीडने जाता येणार आहे.