मुंबई आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय रेल्वे लवकरच मुंबई ते गोवा मार्गावर एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे, ज्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होईल. या ट्रेनमुळे प्रवाशांना सहलीच्या सीझनमध्ये एक आरामदायक आणि वेगवान प्रवास अनुभवता येईल.
येत्या काही आठवड्यांत उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढ होईल, आणि या अनुषंगाने भारतीय रेल्वेने मुंबई आणि तिरुअनंतपुरम (कोचुवेली) दरम्यान एक विशेष समर स्पेशल ट्रेन जाहीर केली आहे. या ट्रेनचा मार्ग गोव्यातून जात असल्यामुळे, मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी ही ट्रेन विशेष फायद्याची ठरेल. विशेष म्हणजे, ही ट्रेन गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
समर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि तिरुअनंतपुरम दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक 01063) ३ एप्रिल ते २९ मे पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणार आहे. ट्रेन ELटीटीहून दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल.ट्रेन शुक्रवारी रात्री १०:४५ वाजता कोचुवेलीला पोहोचेल.
कोचुवेली ते एलटीटी (ट्रेन क्रमांक 01064) स्पेशल ट्रेन ५ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत कोचुवेली येथून सुटेल.ही गाडी शनिवारी संध्याकाळी ४:२० वाजता कोचुवेलीहून सुटेल. सोमवारी सकाळी १२:४५ वाजता एलटीटीला पोहोचेल.
या स्थानकावर थांबेल समर स्पेशल ट्रेन
ही ट्रेन प्रवास करत असताना अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. यात समाविष्ट असलेले स्थानकं अशी आहेत:
ठाणे, पनवेल, पेन, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकरना रोड, कुम्ता, मुरुदेश्वर. या स्थानकांवर थांबा घेऊन गाडी प्रवास करत राहील आणि प्रवाशांना विविध महत्त्वाच्या स्थानकांवर सोयीचा थांबा मिळेल. यामुळे मुंबई आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेगवान आणि आरामदायक होणार आहे, आणि समर स्पेशल ट्रेनच्या सुरु होण्याने प्रवाशांना उत्तम अनुभव मिळेल.