मुंबईला मिळणार दुसरी बुलेट ट्रेन ! या’ मार्गावर धावणार हायस्पीड रेल्वे, पुण्यासह 11 थांब्यांचा असेल समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतीय रेल्वे जगात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात मोठं पाऊल टाकत आहे. वंदे भारतसारख्या हायस्पीड ट्रेननंतर आता देशात बुलेट ट्रेनच्या प्रकल्पांनाही गती मिळत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे आता मुंबईला दुसऱ्या बुलेट ट्रेनची भेट मिळणार आहे.

मुंबई ते हैदराबाद या दोन महानगरांना जोडणारा मुंबई-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे (MHHSR) प्रकल्प सध्या केंद्र सरकारच्या प्राथमिक यादीत असून, याला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प मुंबई, पुणे आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांना वेगवान रेल्वेने जोडणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • एकूण लांबी: सुमारे 767 किलोमीटर
  • एकूण स्थानके: 11
  • गती: 350 किमी/तास
  • प्रत्येक ट्रेनची प्रवासी क्षमता: 750 प्रवासी
  • ट्रॅक आणि सिग्नलिंग: 25 किव्ही एसी ओव्हरहेड ट्रॅक्शन व डिजिटल सिग्नलिंग प्रणालीचा वापर

हे 11 थांबे असतील या मार्गावर

  1. बांद्रा-कुर्ला (मुंबई)
  2. नवी मुंबई
  3. लोणावळा
  4. पुणे
  5. करकुंब / दौंड
  6. अकलूज
  7. पंढरपूर
  8. सोलापूर
  9. कलबुर्गी (गुलबर्गा)
  10. जहीराबाद
  11. हैदराबाद

या 11 स्थानकांपैकी 8 स्थानके महाराष्ट्रातच असल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे मुंबई-हैदराबाददरम्यानचा प्रवास केवळ जलद नव्हे तर अधिक सुरक्षित व आरामदायी होणार आहे. सध्या या प्रकल्पाचं सर्वेक्षण आणि निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामासही सुरुवात होण्याची शक्यता आहे. देशातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची वाटचाल आता निर्णायक टप्प्यावर आहे.