Mumbais 5 Major Projects : अटल सेतू ही केवळ झलक…! मुंबईला न्यूयॉर्क बनवणारे 5 प्रकल्प सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbais 5 Major Projects : देशाची आर्थिक राजधानी मुंबई पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जगातील आघाडीच्या शहरांमध्ये सामील होण्यास तयार आहे. शहरात सध्या अनेक मेगा प्रोजेक्ट सुरू असून अनेक पूर्ण झाले आहेत. मुंबई ते नवी मुंबई जोडणाऱ्या अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरात कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक प्रकल्पांचे (Mumbais 5 Major Projects) बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबईला जगातील अग्रगण्य शहरांमध्ये स्थान मिळेल.

कोस्टल रोड

मुंबईतील ट्रॅफिक जॅमपासून सुटका करण्यासाठी BMC 29.2 किमी लांबीचा कोस्टल रोड बनवत आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू होणार होता परंतु आता त्याचा पहिला टप्पा मे 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाची किंमत 12,000 कोटी रुपये आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा समुद्राखालचा बोगदा ३१ जानेवारीपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. यामध्ये सायकल ट्रॅक, जॉगिंग एरिया, ओपन ऑडिटोरियम, फुलपाखरू उद्यान आणि इतर अनेक सुविधा असतील.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र द्वारे विकसित केला जात आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, पुढील वर्षी मार्चमध्ये व्यावसायिक कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे. हा संपूर्ण प्रकल्प २०३१ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 16,7000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील ताणही कमी होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विकसित होत आहे. हा प्रकल्प नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने बांधला आहे. त्याचा पहिला टप्पा 2026 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाची (Mumbais 5 Major Projects) एकूण किंमत 1.1 लाख कोटी रुपये आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गुजरातमध्ये या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

ऐरोली-काटई बोगदा (Mumbais 5 Major Projects) 

एमएमआरडीए ऐरोली-काटई बोगदा आणि ऐरोली-कल्याण-शीळ कॉरिडॉर बांधत आहे. बोगदा रस्ता 17 किमी लांबीचा आहे आणि कॉरिडॉर 33.8 किमी लांबीचा आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 945 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात बांधला जात असून, या वर्षात त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे डोंबिवली पूर्व, कल्याण-शीळ रस्ता आणि नवी मुंबईतील नागरिकांना फायदा होणार आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड

हा सहा पदरी 12 किमी लांबीचा रस्ता शहराच्या पश्चिम भागाला पूर्व भागाशी जोडणार आहे. डिसेंबर 2026 मध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 6,225 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण होत आहे. हा प्रकल्प (Mumbais 5 Major Projects)  पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड दरम्यानचा प्रवासाचा वेळ २० मिनिटांनी कमी होईल.