Mumps Disease : गालगुंड कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumps Disease) जगभराने कोरोना महामारीचा उद्रेक पाहिला आहे. त्यामुळे आजकाल एखाद्या विषाणूचा साधा उल्लेख जरी झाला तरी घाबरायला होते. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये गालगुंडाची लागण झालेले शेकडोहून जास्त रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. अर्थात राज्यभरात ‘गालगुंड’ची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही तज्ञ डॉक्टरांनी आधीच गालगुंड आजाराविषयी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गालगुंड हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे हा आजार कसा पसरतो? आणि याची लक्षणे काय ? तसेच यावर काय उपाय करता येतील? याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

गालगुंड कशामुळे होतो? (Mumps Disease)

गालगुंड हा एक संसर्गजन्य आजार आहे. जो पॅरामिक्झो नावाच्या विषाणूमुळे होतो. या आजराचे लहान मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाण दिसून येते. यामागचे एकमेव कारण म्हणजे अनेक मुलांचे नियमित लसीकरण झालेले नाही वा कमी लसीकरण झाले आहे. या आजाराने संक्रमित व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. केवळ लहान मुले नव्हे तर हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. वेळीच लक्षणे समजली तर यावर उपचार करणे सोपे जाते. जाणून घेऊया लक्षणे.

गालगुंडची लक्षणे

गालगुंड हा संसर्गजन्य आजारा इतर संसर्गजन्य आजरांसारखाच होतो. या आजारात सुरुवातीला पुढील लक्षणे दिसून येतात.
कणकण,
ताप,
अस्वस्थता,
शरीरदुखी,
स्नायूदुखी,
भूक न लागणे,
उदासीनपणा.
या लक्षणांतर हा विषाणू २ आठवड्यात किंवा त्याआधीच शरारीत प्रवेश करतो. (Mumps Disease) यानंतर पॅरोटीड ग्रंथींच्या जळजळीने कानाभोवती आणि तुमच्या जबड्याच्या बाजूला तीव्र वेदना जाणवू लागतात. अशावेळी जबड्यात दुखत असल्याने तुम्ही अन्नदेखील चावून खाऊ शकत नाही.

गालगुंडांवर उपाय

गालगुंड हा आजार बहुतेक लहान मुलांना होतो. यापासून बचावासाठी मुलांना MMR Vaccine दिले जाते. तर, मोठ्यांना मर्यादित प्रमाणात अँटी व्हायरल आणि वेदनाषमक औषधं दिली जातात. सामान्यतः MMR लसीचा पहिला डोस मूल १२ ते १५ महिन्यांचे असताना आणि दुसरा डोस ४ ते ६ वर्षांच्यादरम्यान दिला जातो.

(Mumps Disease) मात्र बरेच लोक आपल्या मुलांना या लसी देत नाहीत. ज्यामुळे पुढे भविष्यात मुलांना गालगुंड होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे, या आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानुसार रक्त, लाळ किंवा डॉक्टर सांगतील त्या चाचण्या करून घ्या. यामुळे संसर्ग कधी झाला? आणि त्यावर काय उपाय करायला हवे? ते समजते.

‘अशी’ काळजी घ्या

गालगुंड पसरवणारा विषाणू हा श्वसन मार्गात विकसित होतो आणि नंतर संक्रमित व्यक्तीच्या लाळ वा श्वसनाच्या थेंबातून थेट दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करतो. त्यामुळे इतर लोकांमध्ये हा विषाणू पसरू नये म्हणून रुग्णाने स्वतःला सर्वांपासून दूर ठेवा. तसेच आजरपणात आजूबाजूची आणि वैयक्तिक स्वच्छता महत्वाची ठरते. (Mumps Disease) वारंवार हात धुणे, खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, डोअर नॉब, बाथरूमचा नळसारख्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या वस्तू इतरांना वापरण्यास न देणे.