हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि प्रभावी पर्याय शोधत असाल, तर म्युच्युअल फंडामधील एसआयपी (Systematic Investment Plan) हा एक चांगला ऑपशन ठरू शकतो. फक्त 1000 रुपयांपासून सुरू होणाऱ्या एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी फक्त 12-30-12 या सोप्या फॉर्म्युल्याचा अवलंब करावा लागतो. तर चला या फॉर्म्युल्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात .
नफा कमावण्याची संधी
या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून लोकांना दीर्घकालीन नफा कमावण्याची संधी प्राप्त होते. तुम्हाला प्रत्येक वर्षी टॉप अप एसआयपी गुंतवणुकीत 12% वाढ करायची आहे. त्यानंतर ही गुंतवणूक सलग 30 वर्षे चालू ठेवावी लागेल . या तीस वर्ष्याच्या कालावधीत तुम्हाला त्या रक्कमेवर अंदाजे 12% नफा मिळू शकतो. आपण हे एका उदाहरणाच्या साह्याने समजून घेऊयात , समजा तुम्ही सुरुवातीला 1000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली, तर पहिल्या वर्षात तुम्ही एकूण 12,000 रुपये गुंतवाल. त्यानंतर प्रत्येक वर्षी 12% टक्क्यांनी ही रक्कम वाढवा. दुसऱ्या वर्षी तुम्ही 1120 रुपये प्रति महिना, तिसऱ्या वर्षी 1254 रुपये प्रति महिना, असे करत तुमची गुंतवणूक वाढत जाईल.
12-30-12 फॉर्म्युल्याचे काटेकोरपणे पालन
जर तुम्ही या फॉर्म्युल्याचे काटेकोरपणे पालन केले, तर 30 वर्षांत तुम्ही एकूण 28.96 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. या गुंतवणुकीवर तुम्हाला साधारणतः 83.45 लाख रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच 30 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 1 कोटी 12 लाख 41 हजार 603 रुपये जमा होतील.
आर्थिक सल्ला महत्त्वाचा
म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणूक ही शेअर बाजाराशी जोडलेली असते , म्हणून त्यामध्ये कमी जोखीम असते. गुंतवणूक केल्याने व्याजावर व्याज (Compound Interest) मिळत राहते . एसआयपी हा गुंतवणुकीचा आधुनिक आणि लोकप्रिय पर्याय आहे. फक्त 1000 रुपयांपासून सुरू करून, 12-30-12 फॉर्म्युल्याच्या साहाय्याने करोडपती होण्याचा मार्ग निवडता येईल. पण गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. अशा गुंतवणुकीने तुमच्या भविष्याला सुरक्षित आणि समृद्ध बनवा.