MVA Seat Sharing : महाराष्ट्रात नवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पक्षांमध्ये जागावाटप आणि उमेदवारी देण्यावरून जोरदार खलबतं सुरु आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपावरुन सुरू असलेली कोंडी फुटूली आहे. महाविकास आघाडी मध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये बैठक झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या हवाल्याने महविकास आघाडीतून जागावाटप समोर (MVA Seat Sharing) आले आहे.
पटोले यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले
काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांच्यातील वादानंतर पटोले यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. थोरात आणि पवार यांच्या बैठकीत नाना पटोलेही उपस्थित नव्हते. मात्र, थोरात म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले आहे.
पवार आणि उद्धव यांची थोरात यांची भेट
पवार आणि उद्धव यांच्यासोबत थोरात यांच्या बैठकीत उद्धव यांची शिवसेना मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवणार आणि राज्यात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार, असा निर्णय झाला. मात्र, हा फरक 5 ते 10 जागांपेक्षा जास्त असणार नाही. आता महाविकास आघाडी कधीही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. सर्वप्रथम ज्या जागांसाठी विरोध नाही अशा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
उबाठा महाराष्ट्रात 100 पेक्षा कमी जागांवर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या जागांवर एकापेक्षा जास्त प्रबळ दावेदार आहेत किंवा ज्या जागांवर बंडखोरी होण्याची शक्यता आहे त्या जागा नंतर जाहीर केल्या जातील किंवा थेट उमेदवाराला एबी फॉर्म दिला जाईल. मात्र, शिवसेना महाराष्ट्रात 100 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवण्याची 25-30 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती असताना दोन्ही पक्ष १२५ हून अधिक जागांवर निवडणूक लढवत असत, मात्र यावेळी तीन भागीदारांमुळे उद्धव यांना १०० किंवा त्याहून कमी जागांवर समाधान मानावे लागेल. मात्र मुंबईत शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे त्यांना मुंबईत जास्त जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
काँग्रेस 100 ते 105 जागांवर
अहवालानुसार, महाराष्ट्रातील 288 जागांपैकी काँग्रेस 100 ते 105 जागांवर, शिवसेना (UBT) 96 ते 100 जागांवर आणि NCP (SP) 80 ते 85 जागांवर लढणार आहे. तर मुंबईत शिवसेना (UBT) 19 जागांवर, काँग्रेस 14 जागांवर, राष्ट्रवादी (शरद पवार) 2 जागांवर आणि समाजवादी पक्ष एका जागेवर लढणार असण्याची शक्यता आहे.
288 मध्ये कोणाकडे किती जागा असतील ?
काँग्रेस- 100 ते 105
शिवसेना (UBT) – 96 ते 100
NCP(SP)- 80 ते 85