Mysterious Places In India : रहस्यमयी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत ‘ही’ ठिकाण; विश्वास ठेवणं जाईल अवघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mysterious Places In India) आपल्या देशभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी फिरण्यासाठी पर्यटक लांबून येत असतात. आपल्या देशातील नैसर्गिक संपन्नता आणि पुरातन वास्तूंची भव्यता कायम पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असते. खास करून परदेशी पर्यटक भारताच्या सौंदर्याला अधिक भुलतात. आज आपण अशाच काही पर्यटन स्थळांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांच्या ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंमध्ये समावेश आहे. मात्र येथील विचित्र हालचाली आणि घटना पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करतात. अशाच काही ठिकाणांची आपण माहिती घेणार आहोत. ज्यांचं गूढ वैज्ञानिक देखील शोधू शकलेले नाहीत.

अग्रसेन की बाओली

दिल्लीतील ‘अग्रसेन की बाओली’ (Mysterious Places In India) ही वास्तू १४ व्या शतकात महाराजा उग्रसेन यांनी बांधली होती. याच्या आख्यायिकेनुसार, बाओलीचे संमोहन करणारे काळे पाणी एखाद्याच्या मानसिक आणि भावनिक विचार प्रक्रियेत गोंधळ घालण्याची क्षमता ठेवते. मुख्य म्हणजे या संमोहनातून कुणीही व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते. या ठिकाणी शेवटचा आत्महत्येचा प्रयत्न २००७ साली झाला होता. त्यामुळे लोक या ठिकाणी जायला घाबरतात आणि पर्यटक इथे जाणे टाळतात.

भानगड किल्ला (Mysterious Places In India)

राजस्थानच्या जयपूरमधून ३२ मैल दूरवर असलेला ‘भानगड किल्ला’ भुताटकीच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याशी अनेक भूत-प्रेत कथा निगडित आहेत. हा किल्ला १७ व्या शतकापासून पछाडलेला असून एका ऋषीमुनींच्या शापामुळे खंडर झाला आहे. इथे रात्रीच्या वेळी किंकाळ्या, रडण्याचा आवाज, बांगड्या फोडण्याचा आवाज येतो. (Mysterious Places In India) शिवाय इथे गेलेल्या माणसाला आपला कुणीतरी पाठलाग करत असल्याचे भासते. इतकेच नव्हे तर इथे सूर्यास्तानंतर गेलेली माणसं परत येत नाहीत.

अजिंठा- एलोरा लेणी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा अजिंठा – एलोरा लेणी अत्यंत रहस्यमयी आहेत. या लेण्या ४ हजार वर्ष जुन्या इतिहासाची साक्ष देतात. अजिंठा येथे सुमारे ३० तर एलोरा येथे १२ लेणी आहेत. (Mysterious Places In India) असं म्हणतात की, या खडकाच्या खाली एक शहर वसले आहे. शिवाय या लेण्यांचा एका प्रेमकथेशी देखील संबंध जोडला जातो.

आंध्रचे लेपाक्षी मंदिर

दक्षिणेकडील आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिर अत्यंत प्रसिद्ध आणि तितकेच रहस्यमय म्हणून ओळखले जाते. हे मंदिर १६व्या शतकात बांधले होते. (Mysterious Places In India) अत्यंत प्राचीन आणि पुरातन अशा या मंदिरात तब्बल ७० खांब आहेत. मात्र या मंदिरातील एक खांब अत्यंत रहस्यमयी जाणवतो. जो छताच्या मदतीने हवेत लटकतो आहे. या खांबाचे गूढ विज्ञान देखील उलगडू शकलेलं नाही.

रूपकुंड तलाव

उत्तराखंडमधील रुपकुंड तलाव हे सर्वश्रुत आहे. या सरोवराच्या अवती भोवती कायम मानवी सांगाडे दिसून येतात. या तलावाची उंची जमिनीपासून ५०२९ मीटर इतकी आहे. या तलावाचे रहस्य इतके गजब आहे की वैज्ञानिकदेखील थक्क होतात. (Mysterious Places In India)