Nach Ga Ghuma : ‘बाईचं आयुष्य असंच…’: ‘नाच गं घुमा’च्या ट्रेलरने हसता हसवता टचकन आणलं डोळ्यात पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) चित्रपटाची विशेष चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टायटल साँग, गडबड गीत आणि टीझर अगदी काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाले. यानंतर आता ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

मुक्ता बर्वेची पोस्ट

अभिनेत्री मुक्ता बर्वेने ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma)या चित्रपटाचा ट्रेलर तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना मुक्ताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘महाराणी आणि परीराणीच्या विश्वात घेऊन जाणारी ⁠तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, आशा आणि राणी सांगणार… ”नाच गं घुमा”चा ट्रेलर आलाय!!! हिरण्यगर्भ मनोरंजन निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ”नाच गं घुमा” १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात…’



मुक्ताने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगितली आहे. त्यानुसार ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट येत्या १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समजते.

‘नाच गं घुमा’चा ट्रेलर (Nach Ga Ghuma)

‘नाच गं घुमा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात मुक्ता बर्वेपासून होते. सुरुवातीलाच, ‘मी आशाताईंना कामावरून काढून टाकले’ असे ती तिच्या नवऱ्याला सांगताना दिसते. यानंतर घरात कामवाली नसल्यामुळे होणारा कामांचा पसारा, कौटुंबिक वाद विवाद आणि एकंदरच तिला कामावरून काढून टाकल्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. दरम्यान नवी कामवाली शोधताना राणी आणि तिच्या कुटुंबाची कशी तारांबळ उडते हे देखील यात दाखवण्यात आले आहे.

नाच गं घुमा Nach Ga Ghuma Official Trailer | Mukta Barve | Namrata | Swapnil Joshi & Paresh Mokashi

ट्रेंडिंग लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

चित्रपटाच्या कथानकात मजा, कॉमेडी आणि त्यासोबत भावनिक जोड देण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील आपल्या आसपासच्या या महत्वाच्या विषयावर चांगला जोर दिल्याचे दिसते.(Nach Ga Ghuma) त्यामुळे युट्युबवर हा ट्रेलर आतापर्यंत ट्रेंडिंग लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. इतकच नाही तर हा ट्रेलर साधारण ३ लाख ५२ हजारपेक्षा अधिकवेळा पाहिला गेला आहे.

प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते..

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते, अशा सुंदर अर्थाने परिपूर्ण असलेल्या वाक्याने या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात झाली. या वाक्याची तंतोतंत टोटल लागेल अशी दृश्य ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहेत. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी आहेत. (Nach Ga Ghuma) तर या चित्रपटाची निर्मिती अभिनेता स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी केली आहे.

दमदार कलाकार

या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मध्यवर्ती भूमिकेतून आपल्या भेटीस येत आहेत. तर चिमुकली मायरा वायकुळ बरोबर स्वतःकडे लक्ष वेधून घेतेय. यांच्यासह सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, आशा गोपाल, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि सारंग साठेदेखील मुख्य भू्मिकेत दिसत आहेत. (Nach Ga Ghuma) या चित्रपटाची कथा स्त्रियांच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांना अधोरेखित करत गंमत जंमत करत एका महत्वाच्या विषयावर भाष्य करत आहे. हा चित्रपट १ मे २०२४ रोजी राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.