Nagar-Parli Railway Line : भारतामध्ये सर्वत्र रेल्वेचे जाळे विखुरलेले आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर सध्या रेल्वे गाड्या वाढवणे, नवीन मार्ग तयार करणे, याशिवाय राज्यातील इतर भाग मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांशी रेल्वे मार्गाने जोडण्याचे काम केले जात आहे. देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने ही पावले उचलली जात आहेत. अशातच आता अहमदनगर मुंबई , पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे. याबाबत अपडेट (Nagar-Parli Railway Line) समोर आली आहे चला जाणून घेऊया …
कधीपासून धावणार रेल्वे ?
बीड आणि अहमदनगर हे दोन महत्वाचे जिल्हे मुंबई आणि पुणे शहराशी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नगर- बीड- परळी या रेल्वे मार्गाचे 132.92 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झालेले असून हा रेल्वे मार्ग एकूण 261.25 किलोमीटर लांबीचा आहे. साधारणपणे 25 डिसेंबर 2025 पर्यंत हा लोहमार्ग पूर्ण करण्याचे रेल्वेच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आले असून डिसेंबर 2025 पासून या लोहमार्गावर पूर्ण क्षमतेने रेल्वे धावणार आहे.
अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी, नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांकरिता हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून या रेल्वे मार्गावर असणाऱ्या परळी रेल्वे स्टेशन वरूनच जे प्रवासी दक्षिणेकडे जातील किंवा येतील अशा प्रवाशांना थेट याच नगर- बीड- परळी रेल्वे स्थानकातून मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाणे देखील शक्य होणार आहे.
ताशी 130 किलोमीटर वेगाने चाचणी (Nagar-Parli Railway Line)
मागील सात वर्षाच्या कालावधीपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू होते. या रेल्वेमार्गाच्या निमित्ताने या परिसरामध्ये प्रथमच रेल्वे मार्गाचे आगमन झालेले आहे. या रेल्वे मार्गावर नगर ते नारायणगाव, नारायणगाव ते सोलापूर वाडी व सोलापूर वाडी ते आष्टी आणि आष्टी ते अमळनेर दरम्यान चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये ऑगस्ट महिन्यात अमळनेर ते विघनवाडी दरम्यान ताशी 130 किलोमीटर वेगाने चाचणी घेण्यात आलेली होती. साधारणपणे घेण्यात आलेल्या चाचण्या बघितल्या तर 95 किलोमीटर अंतरावरील चाचण्या पूर्ण करण्यात आलेले आहेत व संपूर्ण 132 किलोमीटर अंतराचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले आहे. या रेल्वे मार्गाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या परळी (Nagar-Parli Railway Line) रेल्वे स्थानकातून बीड आणि नगर मार्गे मुंबई व पुणे थेट रेल्वे सुरू होणार आहे.
रेल्वेमार्गे गाठता येणार मुंबई, पुणे
मिळालेल्या माहितीनुसार परळी स्थानकातून नांदेड तसेच हैदराबाद, छत्रपती संभाजी नगर, बेंगलोर, तिरुपती, सिकंदराबाद, बिदर, गुंटूर आणि लातूर या ठिकाणच्या प्रवाशांना या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्याला जाणे शक्य होणार आहे. या रेल्वे मार्गावर पाचशे मीटर लांबीचे 18 मीटर उंचीचे नऊ पूल उभारण्यात (Nagar-Parli Railway Line) आलेले आहेत.
कधीपर्यंत काम होणार पूर्ण ?
यासोबतच अहमदनगर ते बीड हा जो काही तीस किलोमीटर रेल्वेमार्ग आहे तो नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे व त्यासोबतच बीड ते वडवणी 32 किमीचा रेल्वे मार्ग आहे तो (Nagar-Parli Railway Line) मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण नगर- बीड परळी रेल्वे मार्ग डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.