Nagpur-Goa Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

0
3
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील इतरही काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तीपीठ सुपर एक्स्प्रेस वेचे काम थांबले होते, मात्र आता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आगामी 100 दिवसांच्या कामांची आढावा बैठक बोलावली होती. या दरम्यान राज्यातील काही महत्वाच्या प्रकल्पांबाबत सूचना देण्यात आल्या.

यामध्ये शक्तीपीठ सुपर एक्स्प्रेस वेच्या कामासहित मंत्रालयात नवीन सात मजली इमारत (Nagpur-Goa Shaktipeeth Expressway) बांधण्याच्या कामाला गती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे (७६ किमी) काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील 13.30 किमी लांबीच्या मिसिंग लिंकच्या दुरुस्तीचे कामही लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. असेही म्हंटले.

या बैठकीला लोक निर्माण मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, राज्य मंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, लोकनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंके उपस्थित होते.

शक्तीपीठ महामार्गाची गरज

वास्तविक 2023 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा केली होती.
हा ७६० किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे वर्धा येथून सुरू होऊन यवतमाळ, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपेल. हा महामार्ग माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई शक्तीपीठ या श्रद्धा केंद्रांना रस्त्याने जोडेल. औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाशिवाय (Nagpur-Goa Shaktipeeth Expressway) नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर तीर्थ हे ठिकाणही शक्तीपीठ महामार्गाला जोडता येईल.

शक्तीपीठ अंतर्गत ‘या’ जिल्ह्यांचा विकास

शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग पूर्ण झाल्यावर हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा झपाट्याने विकास होईल. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ सुपर एक्स्प्रेस वेच्या कामाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता, त्यामुळे काम बंद पडले होते. सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचे काम गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील महामार्गांच्या निर्मितीसाठी आराखडा तयार करून रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि सर्वसमावेशक करण्यावर भर द्यावा असे देखील सांगितले आहे.

राज्यात शक्तीपीठ महामार्गासाठी भूसर्वेक्षणाची कामे चालू होती. मात्र असे होत असतानाच हा मार्ग जिथून जाणार आहे तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलने करत आपल्या जमिनीचे देण्यास नकार दिला. राज्यातील जवळपास ८ जिल्ह्यांमध्ये या मार्गाला विरोध करण्यात आला. आंदोलने करण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाचे काम थांबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.