Nagpur Metro : नागपूर मेट्रोचा प्रवास आजपासून स्वस्त ; काय आहेत नवे तिकीट दर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nagpur Metro : रेल्वे खात्याने नुकतेच पॅसेंजर ट्रेनचे प्रवासी भाडे कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा दिला. आता मेट्रोच्या प्रवासी भाड्यातही घट करण्यात आली आहे. मात्र ही घट राष्ट्रीय पातळीवर नसून नागपूर मेट्रोकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी मेट्रो (Nagpur Metro) प्रवास अधिक सोयीस्कर होईल यात शंका नाही. नागपूर मेट्रोने प्रवासी भाडे कमी करण्याचं निर्णय का घेतला ? कधीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे ? किती रुपयांनी कमी झाला तिकीट दर ?चला जाणून घेऊया सर्व माहिती.

राज्यभरात महत्वाच्या शहरांमध्ये मेट्रो (Nagpur Metro) सेवा सुरु आहे प्रवाशांना देखील त्याचा लाभ होतो आहे. नागपूर शहरात देखील मेट्रो अनेक प्रवाशांकरिता सुलभ प्रवासाचे माध्यम बनली आहे. त्यातच आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मेट्रोच्या तिकिटाचे दर कमी करण्यात आले आहेत. नवीन दर आज म्हणजेच १ मार्च पासून लागू करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत

शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेता महा मेट्रोला प्रवासी भाड्यामध्ये घट केली आहे. एवढेच नाही तर नव्या दरातही विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत दिली जाणार असल्याचा महा मेट्रो (Nagpur Metro) कडून सांगण्यात आला आहे.

महाकार्ड सवलत

पहिला स्थानकापासून ते शेवटच्या स्थानकापर्यंत तिकीट दर एक रुपया ने कमी करण्यात आला आहे ऑटोमोटिव चौक ते मिहान या मार्गासाठी 41 रुपये ऐवजी 40 रुपये द्यावे लागतील. लोकमान्य नगर ते प्रजापती नगर या मार्गासाठी 41 ऐवजी 40 रुपये मोजावे लागतील. या सेवेअंतर्गत एका महिन्यात महाकार्ड (Nagpur Metro) वापरणाऱ्या प्रवाशांना मेट्रो न प्रवास करत तिकीट दराच्या माध्यमातून एकूण आठशे रुपयांपेक्षा जास्त प्रवासी भाड्यात खर्च केल्यास त्याला दहा टक्के गुण म्हणजेच पॉईंट्स मिळणार आहेत. महाकार्ड वरती मिळणाऱ्या दहा टक्के सवलती मध्ये कुठलाही बदल नसून यासोबत कॅशबॅक मिळणार आहे या योजनेला अंतिम स्वरूप देणं सुरू आहे.

महा मेट्रोची सेवा (Nagpur Metro)

महा मेट्रोला नुकतेच कस्तुरचंद पार्क दोसर वैश चौक, प्रजापती नगर, शंकर नगर, लोकमान्य नगर, छत्रपती नगर, जयप्रकाश नगर आणि उज्वल नगर या आठ मेट्रोस्थानाकांवर फिडर ऑटो रिक्षा सेवा सुरू केली आहे. याशिवाय नागपूर मेट्रो नागपूर महानगरपालिका आणि मिहान इंडिया (Nagpur Metro) लिमिटेड च्या संयुक्त विद्यमान विमानतळ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत शटल बस सेवा सुरू केली आहे.

सध्या खापरी प्रजापती नगर ऑटोमॅटिक चौक ते लोकमान्य नगर या चार टर्मिनस स्थानकावरून दररोज सकाळी सहा ते दहा या वेळेत दर पंधरा मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू आहे. सकाळी आठ ते 11 आणि सायंकाळी चार ते सात या वेळात दर दहा मिनिटांनी मेट्रोच्या सेवा सुरू आहेत हा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न महा मेट्रो कडून सुरू आहे.

काय आहेत नवे दर ?

मार्ग : सध्याचे दर : सुधारित दर : विद्यार्थ्यांना सवलत
लोकमान्यनगर ते सीताबर्डी : 30 रुपये : 25 रुपये : 18 रुपये
लोकमान्यनगर ते शंकरनगर : 25 रुपये : 20 रुपये : 14 रुपये
शंकरनगर ते सीताबर्डी : 15 रुपये : 10 रुपये : 7 रुपये
शंकरनगर ते चितारओळ : 25 रुपये : 20 रुपये : 14 रुपये
सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक : 25 रुपये : 20 रुपये : 14 रुपये
सीताबर्डी ते चितारओळ : 15 रुपये : 10 रुपये : 7 रुपये
सीताबर्डी ते खापरी : 30 रुपये : 25 रुपये : 18 रुपये
प्रजापतीनगर ते चितारओळ : 20 रुपये : 15 रुपये : 11 रुपये
उज्ज्वलनगर ते चितारओळ : 30 रुपये : 25 रुपये : 18 रुपये