हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Yojana) योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पाच हप्ते दिले गेले असून, सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरु केलेल्या या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होत असून, यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत झाली आहे.
योजनेचा लाभ –
राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हा लाभ तीन हप्त्यांमध्ये प्रत्येक चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या स्वरूपात दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरलेली आहे.
हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा होणार –
रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. याच महिन्यात नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. तसेच याआधी 5 ऑक्टोबर 2024 रोजी नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसानचा अठरावा हप्ता एकाच दिवशी पात्र शेतकऱ्यांना मिळाला होता.
चार महिन्यांच्या अंतराने हप्ते जमा –
दोन्ही योजना चार महिन्यांच्या अंतराने हप्ते जमा करतात. ऑक्टोबर 2024 मध्ये हे पैसे जमा झाल्यानंतर फेब्रुवारी 2025 हा पुढील वितरणाचा कालावधी ठरतो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी या योजना राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांचे फळ असून, यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो.