Nashik Phata Khed Corridor : देशभरात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याकडे कल वाढतो आहे. राज्यातही नवीन रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग यासारख्या मार्गांमुळे छोटी मोठी शहरं एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे त्यादरम्यानच्या गाव आणि शहराच्या आर्थिक भरभराटीला वाव मिळणार आहे. आता पुण्यासाठी सुद्धा एक खुशखबर असून शैक्षणिक केंद्र पुणे एका कॉरिडॉर द्वारे नाशिकशी (Nashik Phata Khed Corridor) जोडले जाणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे.
काय आहे ट्वीट ?(Nashik Phata Khed Corridor)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 7827 कोटी रुपये किमतीच्या 32 किलोमीटर लांबीच्या आठ लेन एलिवेटेड नाशिक फाटा खेड कॉरिडोरला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडोर पुणे पिंपरी चिंचवड आणि चाकण यासारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल. ज्यामुळे या भागाची लॉजिस्टिक कार्यक्षमता (Nashik Phata Khed Corridor) वाढण्यास मदत होईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते खेडसाठी 30 किलोमीटर लांबीच्या आठ लेन एलिवेटेड कॉरिडोरला मंजुरी दिली आहे या कॉरिडोर साठी केंद्र सरकारकडून तब्बल 7827 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय कॉरिडोर पुणे पिंपरी चिंचवड आणि चाकण यासारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडला जाईल अशी माहिती देखील देण्यात आली (Nashik Phata Khed Corridor) आहे.
काय आहेत वैशिष्टय ?
- एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यान NH-60 वरच्या चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रावर निघणाऱ्या (Nashik Phata Khed Corridor) किंवा जाणाऱ्या वाहतुकीसाठी हाय स्पीड कनेक्टिव्हिटी तयार करेल
- या कॉरिडॉर मुळे चिंचवडच्या आसपासची (Nashik Phata Khed Corridor) वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे
- पिंपरी नाशिक फाटा ते खेड या दोन्ही बाजूंच्या दोन्ही लेन सर्विस रोडसह सध्याच्या रस्त्याचे चार-सहा लेन असे अपग्रेड केले जाणार आहेत.
- याशिवाय आठ लेन चा उड्डाणपूल देखील तयार केला जाणार आहे.