दहशतवादाविरुद्ध भारत आता अधिक आक्रमक – एअर चीफ मार्शल भादुरीया; वायुसेना दिवसानिमित्त देशभर उत्साह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । आज राष्ट्रीय वायुसेना दिवस. वायूसैन्यात काम करणाऱ्या देशभरातील सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. आपल्या अचाट शक्तीने,अपरिमीत कष्टाने आणि समर्पण वृत्तीने काम करणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो असंही मोदी पुढे म्हणाले. भारताच्या सेवेसाठी तुम्ही अशाच पद्धतीने तत्पर राहाल असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरीया यांनीही वायसेनेला सदिच्छा देताना बालाकोट मधील कारवाई ही दोन देशातील राजकीय तणाव दूर करून दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं. दहशतवाद रोखण्याच्या दृष्टीने सरकारच्या धोरणांमध्ये आश्वासक बदल होत असून याचा अधिक चांगला परिणाम येत्या काळात दिसून येईल असंही भादुरीया म्हणाले. आज सकाळीच एअर चीफ मार्शल भादुरीया यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिद जवानांना अभिवादन केलं. नौदलाचे प्रमुख करमबीर सिंग हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी सैनिकांकडून संचलन करण्यात आलं.