National Parks India : यंदाच्या उन्हाळ्यात करा भारतातल्या ‘या’ नॅशनल पार्क्स ची सफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

National Parks India : आता लवकरच उन्हाळयाच्या सुट्ट्या सुरु होतील त्यामुळे तुम्ही जर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला जंगलाची सफर करायला आवडत असेल तर आज आम्ही तुम्हाला देशातल्या काही नॅशनल पार्क (National Parks India) बद्दल सांगणार आहोत.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम (National Parks India)

आसामचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (National Parks India) उन्हाळयात फिरायला जाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. काझीरंगा म्हणजे एकशिंगी गेंड्याचे घर आहे. इकोसिस्टिम मधला हा प्राणी तुम्हाला याच राष्ट्रीय उद्यानात पाहायला मिळेल. याशिवाय येथे पाहण्यासारखी इतरही ठिकाणे आहेत.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, उत्तराखंड

भारतातले पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणजे उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क (National Parks India). वाघांच्या संरक्षणासाठी याची स्थापना करण्यात आली. इथे आशियाई हत्ती, बंगाल टायगर, ग्रेट हॉर्नबिल आणि वेगवेगळे प्राणी आणि पक्षी बघायला मिळतात. वाइल्ड लाइफ एक्सप्लोर करण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

तुम्हाला जर वन्य प्राण्यांविषयी आवड असेल तर तुम्ही राजस्थानच्या रणथंभोरमध्ये फिरायला जाऊ शकता. वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाला (National Parks India) अनेक परदेशी पर्यटक भेट देत असतात.एवढेच नाहीतर येथील ऐतिहासिक दुर्गा सुद्धा प्रसिद्ध आहे. 1955 मध्ये याचीस्थापना ‘सवाई माधोपुर खेल अभयारण्य’ म्हणून करण्यात आली. नोव्हेंबर आणि मे महिन्यात रणथंबोर अभयारण्याला भेट देण्याची उत्तम वेळ आहे.

कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

कान्हा नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशातील सातपुडाच्या मैकल रेंजमध्ये आहे, जे भारताचे हृदय आहे आणि मध्य भारतीय हाईलँड्स बनवते. राष्ट्रीय उद्यान (National Parks India) व्याघ्र प्रकल्प म्हणून लोकप्रिय होत आहे आणि विशेष म्हणजे हे उत्कृष्ट वन्यजीव क्षेत्र म्हणून घोषित केले जात आहे. कान्हा नॅशनल पार्कदेखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. बफर आणि कोअर झोनसह कान्हा व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 1945 चौरस किमी आहे.

गिर राष्ट्रीय उद्यान, गुजरात

गिर राष्ट्रीय उद्यानात जंगलाचा राजा सिंहाचे वास्तव्य आहे. वर्षातल्या (National Parks India) ठरविक काळात येथे सफारीचे आयोजन केले जाते. इथे सफारीमध्ये सिंह दिसण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. १९६९ मध्ये गीर जंगलाला वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले. आफ्रिकेंनंतर येथेच सर्वाधिक प्रमाणात सिंह आढळतात.