Thane Borivli Twin Tunnel : चांगली बातमी ! बोरिवली-ठाणे बोगदा प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Thane Borivli Twin Tunnel : राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने ठाणे-बोरिवली दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रविवारी ही माहिती दिली. MMRDA ने जारी केलेल्या निवेदनानुसार, ठाणे शहर आणि बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (SGNP) जाईल आणि पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडेल.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, ठाणे-बोरिवली दरम्यानच्या दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता दिली आहे. हा दुहेरी बोगदा (Thane Borivli Twin Tunnel) 16,600.40 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार असून त्याची एकूण लांबी 11.8 किमी असेल. यापैकी 1.55 किलोमीटरचा लिंक रोड असणार आहे.

बोगद्यात इमर्जन्सी लेनही

त्याचा बाह्य व्यास 13.05 मीटर असेल आणि दर 300 मीटरवर एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात (Thane Borivli Twin Tunnel) जाणारा रस्ता असेल.प्रत्येक बोगद्याला दोन लेन आणि एक आपत्कालीन लेन असेल.

ठाणे – बोरिवली प्रवास होणार सुकर (Thane Borivli Twin Tunnel)

मिळालेल्या माहितीनुसार दुहेरी बोगद्याच्या बांधकामामुळे ठाणे शहर ते बोरिवली दरम्यानच्या प्रवासासाठी एक तास कमी लागणार असून सध्याच्या मार्गावरील वाहनांचा ताणही कमी होणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये ?

  • प्रत्येकी 3 लेनचे दोन (Thane Borivli Twin Tunnel) बोगदे
  • 14 हजार कोटी रुपये खर्च झाले
  • बोरिवली- ठाणे 5.75 किमी लांबीचा बोगदा
  • ठाणे ते बोरिवली ६.१ किमी लांबीचा बोगदा
  • 530 कोटी रुपयांची उपकरणे बसवण्यात येणार आहेत
  • हा प्रकल्प ३ वर्षात पूर्ण होणार आहे