Nayak 2 Movie : तब्बल 23 वर्षानंतर ‘नायक’ सिनेमाचा सिक्वेल येणार; मुख्य भूमिकेत अनिल कपूर झळकणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nayak 2 Movie) बॉलिवूडचा झकास अभिनेता अशी ओळख असलेले अनिल कपूर वयाच्या ६७ व्या वर्षीदेखील एकदम फिट आणि मुख्य म्हणजे सिनेविश्वात कार्यरत आहेत. वयाची सत्तरी जवळ येऊनही अनिल कपूर यांचा फिटनेस कमालीचा आणि यामुळे तरुण कलाकारांमध्ये त्यांच्याविषयी कायम चर्चा असते. अनिल कपूर यांनी आजपर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. अगदी कॉमेडी जॉनरच्या भूमिका देखील या नायकाने कमाल साकारल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वयोगटात त्यांचे चाहते आहेत.

अभिनेते अनिल कपूर यांचा ‘नायक’ हा सिनेमा आजही सुपरहिट आहे. एव्हरग्रीन सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश आहे. अनिल कपूर यांच्या कारकिर्दीतील हा सिनेमा आयकॉनिक ठरला होता. यामध्ये अनिल कपूर यांनी शिवाजी राव गायकवाड नावाचे पात्र साकारले होते. या भूमिकेने कहर केला होता. (Nayak 2 Movie) सिनेविश्वात या सिनेमाचा एक वेगळाच दबदबा बघायला मिळाला. पॉलिटीकल ड्रामा असलेल्या या सिनेमात प्रेक्षक एकाजागी खिळवून ठेवण्याची क्षमता अजूनही आहे. तसेच या सिनेमातील अनिल कपूर यांनी साकारलेली भूमिका आणि त्यांची संवाद फेक मनावर वेगळीच छाप सोडून गेली.

अशातच अनिल कपूर यांच्या अत्यंत गाजलेल्या या ‘नायक’ सिनेमाचा सिक्वेल येणार अशी चर्चा आहे. एका वृत्तानुसार, या चित्रपटाचे नाव हे ‘नायक २’ असे असणार आहे. (Nayak 2 Movie) हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या बॅनरखाली बनवण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मिलन लुथरिया सांभाळणार आहेत. मिलन लुथरिया यांनी आतापर्यंत ‘द डर्टी पिक्चर’, ‘कच्चे धागे’ आणि ‘वंस अपॉन अ टाइम इन मुंबई’ यांसारखे जबरदस्त सिनेमे दिले आहेत.

23 वर्षांनंतर ‘नायक 2’ (Nayak 2 Movie)

‘नायक’ सिनेमाचा सिक्वल हा तब्बल 23 वर्षांनंतर येऊ घातला आहे. त्यामुळे या चित्रपटात आधीची कास्ट असेल की नाही याबाबत नक्की सांगता येत नाही. प्रेक्षकांनी या सिनेमाचा सिक्वलसुद्धा पॉलिटिकल ड्रामा असावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या सिनेमात अनिल कपूर एका वेगळ्या लूकमध्ये दिसतील अशी अपेक्षा आहे. मात्र काही वृत्तानुसार, अनिल कपूर या सिनेमात दिसणार नसून दुसरा अभिनेता मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे असे सांगितले जात आहे. (Nayak 2 Movie) या सिनेमाचे शूटिंग २०२४ या चालू वर्षात सुरु होणार आहे.