Neeraj Chopra Marriage: ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने केलं गुपचूप लग्न; पत्नी आहे टेनिस स्टार

0
1
Neeraj Chopra Marriage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Neeraj Chopra Marriage – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीयांच्या हृदयात ठसा उमटवणाऱ्या नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती. त्याला अनेक मुलाखतींमध्ये खूप वेळा विचारण्यात आले की तो लग्न कधी करणार किंवा त्याची गर्लफ्रेंड आहे का, पण नीरजने या सर्व प्रश्नांना उत्तर दिले नाही. पण आता सोशल मीडियावर एका पोस्टने धुमाकूळ घातला आहे. ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. नीरज चोप्राच्या लग्नाच्या घोषणेनंतर सोशल मीडिया वर त्याच्या चाहत्यांकडून आणि फॉलोअर्सकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर चला या आनंदाच्या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाची घोषणा (Neeraj Chopra Marriage) –

2025 च्या सुरुवातीस नीरज चोप्रा याने आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. रविवारी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाची घोषणा केली. नीरजने आपल्या पत्नी हिमानी मोरसोबत लग्नाच्यातीन फोटो शेअर केले आहेत. त्याने पोस्टमध्ये लिहिले माझ्या कुटुंबासोबत आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहे. या क्षणी आम्हाला एकत्र आणलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ.




नीरज चोप्राच्या पत्नी हिमानी मोर –

नीरज चोप्राच्या पत्नी हिमानी मोर सोनीपत जिल्ह्यातील लाडसौली गावातील आहे. हिमानीने आपले शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून केले असून, त्यानंतर अमेरिकेतील लुईझियाना विद्यापीठातूनही उच्च शिक्षण घेतले आहे. हिमानी टेनिस खेळामध्ये पारंगत असून, सध्या ती अमेरिकेत टेनिस कोचिंग करत आहे . तसेच ती स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये पदवी घेत आहे. (Neeraj Chopra Marriage)

नीरज चोप्राची कामगिरी –

नीरज चोप्रा जो हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे, 2016 मध्ये अंडर-20 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जिंकून प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने 87.58 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकून भारतीयांना अभिमानाचा क्षण दिला. त्याच्या या महान कार्यासोबतच नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून आपली कामगिरी नव्या उंचीवर नेली आहे. तसेच, तो जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय आहे.