Netflix : नेटफ्लिक्सच्या व्हर्च्युअल जगात तुम्ही अनेकदा डुबकी घेतली असेल. नेटफ्लिक्स वरच्या सिरीज आणि चित्रपटांनी तुमचे भरपूर मनोरंजन केले असेलच मात्र आता नेटिक्सफिक्सने रीअल लाईफ मध्ये एंट्री घेतली आहे. नेटफ्लिक्सने आता स्वात:चा पोकॉर्न ब्रँड तयार केला असून लवकरच बाजारात “रेडी टू इट” पॉपकॉर्न पाहायला मिळतील. हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी नेटफ्लिक्सने (Netflix) पॉपकॉर्न कंपनी पॉपकॉर्न इंडियन सोबत “नाऊ पॉपिंग” साठी हात मिळवणी केली आहे. यांतर्गत नेटफ्लिक्स ब्रँडेड पॉपकॉर्न ची नवीन रेडी टू इट लाईन ऑफर करणार आहे.
आता तुम्ही म्हणाल नेटफ्लिक्सचे (Netflix) हे पॉपकॉर्न आपल्याकडे केव्हा मिळतील ? किंवा आपल्याला केव्हा खाता येईल? पण महत्त्वाची बाब अशी की हे पॉपकॉर्न सध्या अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअर्स मध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत. म्हणजेच आपल्याकडे हे पॉपकॉर्न सध्या उपलब्ध नाहीत. नेटफ्लिक्सच्या 226 ग्रॅम पेक्षा जास्त पॅकेट ची किंमत 4.49 डॉलर म्हणजेच 375 रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. आता यामध्ये कुठले फ्लेवर आहेत ? तर नेटफ्लिक्सने (Netflix) पॉपकॉर्न सध्या कर्ड क्लासिक शेडर केडल कॉर्न आणि स्नूनवार्थीं सिनेमन कॅटल कॉर्न या दोन फ्लेवर मध्ये उपलब्ध केले आहेत.
यापूर्वी 2020 मध्ये नेटफ्लिक्सने (Netflix) बेन अँड जेरीजशी करार केला होता ज्यामध्ये नेटफ्लिक्स आणि चिल्ड फ्लेवर्स सादर केले होते. हे फ्लेवर्सही स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.
नेटफ्लेक्स च्या म्हणण्यानुसार नेटवर्कला यामधून भरपूर पैसे कमवायचे असा उद्देश नाही. मात्र हजारो स्टोअर मध्ये त्यांचा हा ब्रँड किरकोळ विक्रेत्यांमध्ये सुद्धा दिसावा अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणजेच लोक नेटफ्लिक्सवर (Netflix) सिरीज आणि चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना नेटफ्लिक्सचे पॉपकॉर्नही एंजॉय करू शकतील. याबाबत बोलताना सांगितलं की नेटफ्लिक्स आणि पॉपकॉर्न इंडियाना नऊ पॉपिंग मध्ये पदार्पण करण्यासाठी एकत्र आलेत. नवीन पॉपकॉर्न लाईन आता स्नॅक्स साठी उपलब्ध असेल.