विमाधारकांसाठी नवीन आव्हान ; LIC ने एनरोलमेंट प्लॅनमध्ये केले बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसीने ( भारतीय जीवन विमा निगम ) त्यांच्या नवीन एनरोलमेंट प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. 1 ऑक्टोबर 2024 रोजी लोकांना पॉलिसीमध्ये प्रवेश करण्यासाठी वय 55 वर्षांवरून 50 वर्षे केले आहे . या निर्णयामुळे 50 वर्षांवरच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्याची संधी कमी झाली असून , विमा काढणाऱ्या लोकांसाठी नवीन आव्हान आहे. त्याचसोबत कंपनीच्या 6 नोंदणी योजनांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

जोखीम कमी करण्यासाठी निर्णय

50 वर्षांच्या वयानंतर मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणून कंपनीने जोखीम कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एलआयसीने प्रीमियम दरांमध्ये सुमारे 10 % वाढ केली आहे . त्यामुळे पॉलिसीधारकांना अधिक आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. सरेंडर व्हॅल्यूच्या बदलामुळे पॉलिसीधारकांना योजनेतून बाहेर पडल्यावर मिळणाऱ्या रकमेत कमी होऊ शकते . त्याचा परिमाण वृद्ध लोकांवर होऊ शकतो . कारण या निर्णयाचा परिमाण थेट विमा संरक्षणावर होईल.

एनरोलमेंट प्लॅन-914 संरक्षण कवच

एलआयसीच्या नवीन एनरोलमेंट प्लॅन-914 मध्ये संरक्षण कवच आणि बचतीची योजना आहे. याचा फायदा पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या वेळी कुटुंबाला भक्कम राहण्यास मदत करते . मुदत पूर्ण झाल्यावर त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. नवीन जीवन आनंद आणि जीवन लक्ष्य योजनांमध्ये विम्याची रक्कम 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केली आहे. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या नोंदणीच्या योजनांमध्ये 6 ते 7 टक्के वाढ केली आहे . तसेच कंपनीच्या 6 योजनांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सिंगल प्रीमियम योजना , नवीन जीवन आनंद, जीवन लक्ष्य, जीवन लाभ, आणि अमृतबाल यांचा समावेश असून , हे नवीन नियम सुमारे 32 विमा उत्पादनांना लागू होणार आहेत.