1 मेपासून ATM व्यवहारांवर नवे शुल्क लागू ; जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार ?

ATM
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशातील प्रत्येक सामान्य ग्राहकासाठी 1 मे 2025 हा दिवस एक नवीन आर्थिक आव्हान घेऊन येणार आहे. कारण आता फक्त ATM वर जाऊन पैसे काढणं किंवा बॅलन्स बघणंसुद्धा तुमच्या खिशाला चाट बसवणार आहे. होय, एकीकडे डिजिटल भारताची वाटचाल सुरू असताना, दुसरीकडे ATM व्यवहार ‘महागडे’ होणार आहेत.

ATM वापरणं होणार ‘लक्झरी’?

आरबीआयने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार, 1 मेपासून ATM मधून पैसे काढणं आणि बॅलन्स तपासणं यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ATM वापरणं म्हणजे आता थेट खिशावर आर्थिक भार!

नवे शुल्क

सध्या फ्री मर्यादेनंतर पैसे काढण्यावर 17 रुपये शुल्क घेतलं जातं, पण आता ते थेट 19 रुपये होणार आहे. इतकंच नाही तर, बॅलन्स तपासण्यासाठी 6 रुपये ऐवजी 7 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजे अगदी बॅलन्स बघायलाही तुमच्याकडून पैसे घेतले जाणार!

मोफत व्यवहारांची मर्यादा

मेट्रो शहरांतील ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या ATM वर फक्त 3 मोफत व्यवहार करता येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक रोख व्यवहारावर 19 रुपये, आणि बॅलन्स तपासणीवर 7 रुपये मोजावे लागणार आहेत.

ग्राहकांच्या पैशातून बँकांची कमाई

ATM सेवा देणाऱ्या बँका एकमेकींकडून ‘इंटरचेंज फी’ आकारतात. आता ही फीही वाढवण्यात आली आहे – खाजगी ग्राहकांसाठी 19 रुपये आणि इतरांसाठी 7 रुपये. या शुल्काचे लोण थेट तुमच्या खिशाला भिडणार आहे.

एसबीआयचे नियम

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना दिलेली मोफत व्यवहारांची भेट फार काळ टिकणार नाही. 1 फेब्रुवारीपासून SBI ATM वर 5 आणि इतर बँकांवर 10 फ्री व्यवहार मिळणार. त्यानंतर मात्र, थेट 23 रुपये प्रति पैसे काढणे अशी मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

ATM व्यवहार महाग का झाले?

एटीएमचे देखभाल, रोख व्यवस्थापन, आणि सुरक्षा यासाठी लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय सरकार आणि बँका डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांना UPI, मोबाईल बँकिंग, आणि इंटरनेट बँकिंगकडे वळवू पाहत आहेत.

ATM वापरणं म्हणजे ‘पैशासाठी पैसे’

1 मेपासून तुम्ही ATM वापरत असाल, तर लक्षात ठेवा – फक्त बॅलन्स पाहायलाही आता तुमच्याकडून पैसे घेतले जातील. आता ATM नाही, डिजिटल बँकिंगच अधिक फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही अजूनही ATM वरच अवलंबून आहात का? वेळ आली आहे डिजिटल पर्यायांकडे वळण्याची!